लोकमत न्यूज नेटवर्कगुहागर : एन्रॉन दाभोळ पॉवर कंपनीने तालुक्यातील अंजनवेल येथे उभारले अत्याधुनिक निरामय रुग्णालय गेली अनेक वर्ष बंद आहे. तालुक्यात कोणतीच वैद्यकीय सुविधा नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद अवस्थेत असलेले हे रुग्णालय सुरू व्हावे, यासाठी शिवतेज फाऊंडेशनने सुरु केलेल्या लोकचळवळीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. हे रुग्णालय सुरू व्हावे, यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठीची माहिती मागविण्यात आली आहे.कोकणातील आरोग्याची सुविधा पाहता सध्या कोरोना विषाणूच्या समस्येला तोंड देण्यासाठी जर या रुग्णालयाची अद्ययावत इमारत शासनाने स्वत:च्या ताब्यात घेतल्यास त्याठिकाणी रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल. जेणेकरून तालुक्याचा कोकणातील जनतेला त्याचा फायदा होईल, याबाबत शिवतेज फाऊंडेशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते.दरम्यान फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनानंतर एवढ्यावरच न थांबता त्यांनी सोशल मीडियावर निरामय रुग्णालय सुरू व्हावे यासाठी आपली सर्वांची साथ मिळावी, असे आवाहन जनतेला केले होते. याची दखल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली होती. जिल्हाधिकारी यांनीही गुहागर तहसील कार्यालयाला पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, या रुग्णालयाच्या इमारतीची चावी न मिळाल्याने रुग्णालयातील आतील भागाची अधिकाऱ्यांना पाहणी करता आली नव्हती.दरम्यान, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनीही हे रुग्णालय सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. सर्वांच्या पाठपुराव्यानंतर दिल्ली दरबारी हे रुग्णालय सुरू करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पुढील कार्यवाहीचे पत्र दिले आहे.
निरामय रुग्णालयासाठी दिल्ली दरबारी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 3:50 PM
लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : एन्रॉन दाभोळ पॉवर कंपनीने तालुक्यातील अंजनवेल येथे उभारले अत्याधुनिक निरामय रुग्णालय गेली अनेक वर्ष ...
ठळक मुद्देपंतप्रधान कार्यालयाकडून दखल राज्याच्या मुख्य सचिवांकडून मागविली माहिती