राजापूर : महावितरण कंपनीच्या साधनसामग्रीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी वीजग्राहकांकडून करण्यात आलेली आहे. राज्य विद्युत मंडळाकडून उभारण्यात आलेले खांब हे ४० वर्षांपूर्वी उभारलेले आहेत. यातील बरेच खांब हे वादळवाऱ्याने पडले आहेत.
गॅस दरवाढीविरोधात निवेदन
रत्नागिरी : वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. जनतेसमोर जगावे की मरावे, असा प्रश्न उभा राहिला आहे. याच वाढत्या महागाईविरोधात रत्नागिरी युवक आणि तालुका विद्यार्थी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
पुलासाठी निधी मंजूर
गुहागर : तालुक्यातील कौंढर काळसूर-झोंबडी-देवघर या रस्त्यावरील कौंढर येथे दोन पूल मंजूर झाले असून, लवकरच या पुलाचे काम पूर्ण केले जाईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. शासनाने या पुलांसाठी दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत.
वरवेलीत कोरोनाला रोखले
गुहागर : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गेले दीड वर्ष कोरोना रोखण्यासाठी गावामध्ये कार्यरत असलेले आरोग्य व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी मनसे आक्रमक
चिपळूण : मनसेतर्फे तालुक्यातील खरवते, ओमळी, नारद खेरकी, ताम्हणमळा, गुळवणे व इतर गावांना जोडणारा मुख्य रस्ता गेली कित्येक वर्षे खड्डेमय, खराब झाला आहे. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.