रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजूनही कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू वाढत आहेत. त्याचबरोबर लोकांना लसीकरणाचे महत्त्व समजले असल्याने जिल्हाभरातून लसीकरणाची मागणी पुढे येत आहे; मात्र लस कमी असल्याने आराेग्य विभागाला सर्वच ठिकाणी लस पुरवठा येत नाही.
नाचणी पिकाचा यशस्वी प्रयोग
रत्नागिरी : तालुक्यातील नारशिंगे गावातील धनश्री, धनलक्ष्मी स्वयंसहाय्यता बचत गटातर्फे ३० गुंठे क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने नाचणी पिकाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. महिला बचत गटाने बहुपयोगी नाचणी पिकाची लागवडही यशस्वी होऊ शकते, हे दाखवून दिले.
अजूनही दुरुस्तीची कामे सुरूच
रत्नागिरी : अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे अनेक गावातील भातशेतीत पाणी साचले होते, तसेच जिल्ह्यात काही भागात शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यामुळे शेतीचे बांधही वाहून गेले होते. हे दुरुस्त करण्यासह शेतीची अन्य कामे शेतकऱ्यांकडून सुरू आहेत.
मदतीचा ओघ सुरूच
खेड : तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून जीवित व वित्तहानी झाली. या आपद्ग्रस्तांना देवगड तालुक्यातील मिठबांव कबीर नगर (बौद्धवाडी) येथील तरुण मंडळ, महिला मंडळाच्यावतीने मदत देण्यात आली. त्याचबरोबर इतर सामाजिक संस्थांकडून नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आलेला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद अखत्यारित ८ पशुवैद्यकीय दवाखाने असून संगमेश्वर, दाभोळ, कडवई येथे १ श्रेणीचे दवाखाने आहेत. या दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी पदे मंजूर असतानाही तिन्ही पदे रिक्त आहेत, तसेच इतरही पशुवैद्यकीय दवाखान्यातील पदे रिक्त आहेत.