शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

सेफ्टी बिलविरोधात निदर्शने

By admin | Published: December 16, 2014 10:09 PM

महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना : दिल्ली येथे उद्या होणाऱ्या निदर्शनांसाठी सर्वत्र तयारी

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या रोड ट्रान्सपोर्ट व सेफ्टी बिल २०१४ या नव्या कायद्यामुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामाच्या विरोधात दि. १८ रोजी नवी दिल्ली येथे महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. दिल्लीत सर्व कर्मचाऱ्यांना जाणे शक्य नसल्यामुळे आंदोलनाला पाठिंबा म्हणून दि. १८ रोजी आगार, युनिट, विभागीय, मध्यवर्ती कार्यालय, मध्यवर्ती कार्यशाळा येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.केंद्र शासनाने रोड ट्रान्स्पोर्ट व सेफ्टी बिल या नव्या कायद्यातील भाग ७ मध्ये प्रवासी वाहतुकीसंबंधात काही अमूलाग्र बदल सूचित केलेले आहेत. त्यामध्ये खासगी वाहतूक व एस. टी.सारखी सार्वजनिक वाहतूक याची गणना एकसारखी केलेली आहे. त्यामुळे सर्वच वैध व अवैध खासगी प्रवासी वाहनांना प्रवासी वाहतूक करताना एस. टी.सारखेच टप्पा वाहतुकीचे परवाने देण्याचे प्रस्तावित आहे. या निर्णयामुळे एस. टी. महामंडळाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. एस. टी. महामंडळ अनेक वर्षे प्रवासी जनतेला सुरक्षित सेवा देत आहे. त्यालाही अडथळा निर्माण होणार आहे. या कायद्यात एस. टी. व अन्य सार्वजनिक उपक्रम आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी काही तरतुदी दिसून येत नाहीत. या कायद्यातील भाग ७ मधील प्रस्तावित बदलांना संघटनेचा विरोध असल्याने केंद्र शासनाच्या संबंधित विभागाशी बैठकीचे आयोजन होणे आवश्यक आहे. महामंडळावर होणाऱ्या परिणामाच्या विरोधात एस. टी. कामगार संघटनेने दिल्ली येथे निदर्शने करण्याचे ठरविले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव शेखर सावंत, खजिनदार संदीप भोंगले, अविनाश तथा शेरू सावंत तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी आज दिल्लीकडे रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)