शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

इच्छुकांचे धाबे दणाणले

By admin | Published: June 14, 2016 11:19 PM

नगराध्यक्ष निवड : जनगणनेच्या गणाप्रमाणे प्रभाग; आरक्षणेही बदलणार

राजाराम पाटील -- इचलकरंजी --नगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाची आरक्षणे बदलण्याबरोबरच जनगणनेच्या गणनिहाय प्रभागरचना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जनतेतून नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवकांचा एक प्रभाग होत असल्याने हे बदल होत असून, पूर्वीप्रमाणेच आरक्षणे गृहीत धरून तयारी करणाऱ्या इच्छुकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये होत आहेत. आगामी निवडणुकांसाठी सन २०११ मधील जनगणनेनुसार नगरसेवकांची संख्या असल्याने नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापूर्वी सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका पार पडल्या, तर नगरसेवकांतून नगराध्यक्षांची निवड झाली.आता बदललेल्या सरकारने निवडणूक पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. दोन नगरसेवकांचा एक प्रभाग आणि नगराध्यक्षांची निवड जनतेतून करण्याची घोषणा केली. नगराध्यक्षांची निवड होण्याची पद्धती आणि कालावधी बदलल्याने नगराध्यक्षपदाची आरक्षणे बदलणार, असे निश्चित झाले. त्यासाठी आता नगरविकास मंत्रालयाकडून नवीन नियमावली करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जनगणनेच्या आधारे हे आरक्षण निश्चित केले जाणार असल्याने जुनी आरक्षणे आपोआपच रद्द होणार आहेत.दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाप्रमाणे काही इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. त्यादृष्टीने प्रभागात आणि शहर पातळीवर काही कार्यक्रम आणि उपक्रम राबविले होते. निवडणूक आचारसंहितेपूर्वी लोकांच्या नजरेत येण्यासाठी काही आंदोलनेही केली होती; पण नगराध्यक्षपदाची आरक्षणे पुन्हा बदलणार आणि जनगणनेतील गणाप्रमाणे नगरसेवकपदाच्या रचना असणार असे समजताच अशा इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. पुन्हा फेरजुळवणीसाठी तयारी करताना आता दमछाक होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.जूनअखेरीस आरक्षण सोडती शक्यनगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या सोडती नवीन नियमावली तयार झाल्यानंतरच काढल्या जातील. या नियमावलीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. नियमावली पुढील आठवड्यात तयार होऊन सोडती जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निघतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यानंतरच नगरसेवकपदाची आरक्षणे काढण्यात येऊन जाहीर होतील.