शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अधीक्षकाच्या चौकशीचा ठराव

By admin | Published: February 02, 2016 11:17 PM

जिल्हा परिषद : बांधकाम विभागातील महिला त्रस्त

रत्नागिरी : चिपळूण बांधकाम विभागातील महिला कर्मचारी त्रस्त असल्याप्रकरणी अधीक्षकाबद्दल बांधकाम समितीच्या सभेत सभापती देवयानी झापडेकर यांच्यासह सर्वच सदस्यांनी संताप व्यक्त केला. त्या अधीक्षकाची सखोल चौकशी करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव सोमवारच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभापती देवयानी झापडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बांधकाम समितीची पहिलीच सभा झाली. जिल्हा परिषद, चिपळूण बांधकाम विभागातील अधीक्षक बाळाजी कलेक्टवार याच्यामुळे महिला कर्मचारी हैराण असल्याचे वृत्त सोमवारी लोकमध्ये प्रसिध्द झाले. या वृत्ताची दखल आजच्या झालेल्या बांधकाम समितीची सभेत घेण्यात आली. महिला कर्मचाऱ्यांशी उध्दट वागणे, त्यांना वाईट शब्दात बोलणे, धमक्या देणे अशा सततच्या प्रकारामुळे महिला कर्मचारी हैराण झाले होते. याबाबत चिपळूण बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याशीही महिला कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी तक्रार केली होती. आज झालेल्या सभेत सर्वच सदस्यांनी हे प्रकरण उचलून धरले. सदस्यांनी याप्रकरणी संताप व्यक्त करुन अधीक्षकाला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. त्यामुळे याप्रकरणी अधीक्षकाची चौकशी करुन त्याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे सर्वानुमते ठरावही या सभेत मंजूर करण्यात आला. सभेत मागील सभेचे इतिवृत्तही मंजूर करण्यात आले. त्यानंतर रत्नागिरी आणि चिपळूण बांधकाम विभागातील कामांचा आढावा घेण्यात आला. या सभेला माजी सभापती अजित नारकर, सदस्या शीतल हर्डीकर, अन्य सदस्य व अधिकारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर) पंचायत समिती इमारत मान्यतेला मुदतवाढ? रत्नागिरी पंचायत समितीची इमारत जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली. त्यामुळे पंचायत समितीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अन्य ठिकाणी जागा देण्यात येणार असून, ती प्रक्रिया सुरु आहे. पंचायत समितीच्या प्रस्तावित इमारतीसाठी १ कोटी ७१ लाख रुपये मंजूर आहेत. मात्र, जागेच्या वादात ते अनुदान गेली तीन वर्षे पडून आहे. या इमारतीबाबत गेली ३ वर्षे कारवाई झालेली नाही. त्यामुळे या इमारतीची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात यावी, असे कोकण आयुक्तांनी जिल्हा परिषदेला कळविले आहे. आजच्या बांधकाम समितीच्या सभेत याविषयी चर्चा झाली. त्यामध्ये जागेचा प्रश्न सुटेपर्यंत इमारतीच्या प्रशासकीय मान्यतेला मुदतवाढ मिळावी, असा ठराव आज बांधकाम समितीच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती सभापती देवयानी झापडेकर यांनी दिली.