रत्नागिरी : चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. रत्नागिरीत दौरा करुन ते सिंधुदुर्गकडे जाणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील पाहणी करून हे दोन्ही नेते ११.३० वाजता बोरज येथे दाखल होतील. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करुन ते १.३० वाजता संगमेश्वर येथील डेडिकेटेड केअर सेंटरला भेट देणार आहेत. तेथून दुपारी २.१५ वाजता ते रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. २.४५ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत. भाजपच्या ऑक्सिजन बँकेचा लोकार्पण सोहळा येथे होणार आहे. ४.३० वाजता ते स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेला भेट देणार आहेत. तेथे आंबा बागायतदार आणि मच्छीमारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तेथून ते परकार हॉस्पिटलला भेट देणार आहेत. या भेटीनंतर सायंकाळी ५.१५ वाजता ते सिंधुदुर्गकडे रवाना होणार आहेत.