कुंभाड : मार्गशीर्ष महिन्यात व्रतवैकल्य आणि विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम जास्त असतात. त्यामुळे खेड तालुक्यात फुलांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. ऐन मार्गशीर्ष महिन्यात अव्वाच्या सव्वा भाव वाढल्याने देवाला फुले वाहताना हात आखडता घ्यावा लागत आहे़ सामान्यत: ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने मिळणाऱ्या झेंडूंच्या फुलांचा दर आता १०० ते १२० रुपये किलो इतका झाला आहे. महागाईने आधीच होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना परमेश्वराजवळ हात जोडून सुगंधाविना फक्त भक्ती व्यक्त करावी लागत आहे. खेडच्या बाजारपेठेत फुलांची आवक अपुरी असून, मनाजोगी फुले ग्राहकांना मिळत नाहीत. गेल्या काही महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात व्रतवैकल्ये करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे फुलांचे दर या महिन्यात दरवर्षी महागच असतात, असे येथील व्यापाऱ्यांनी बोलताना सांगितले.फुलांच्या भावात अव्वाच्या-सव्वा वाढ झाली आहे. २ रुपयांना मिळणारा हार ५ रुपये झाला आहे आणि ५ रुपयांना मिळणारा १५ रुपयांवर गेला आहे़ मोठे हार ३०-४० रुपयांपर्यंत मिळत असत, त्याची किंमत ६०-७० ते १०० रुपयांपर्यंत गेली आहे. हिंदू धर्मात चैत्र महिना अतिशय महत्त्वाचा व पवित्र मानला जातो. या महिन्यात भूमिपूजन, वास्तुशांती नसली तरी पाडव्याला मात्र करतात़ तसेच देवदेवतांच्या प्रसन्नतेसाठी उत्तम मानलेला हा चैत्र महिना देव पूजा, देवीचे पठण, मंत्रग्रहण तसेच पंचमी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा या तिथी देवपूजेला अतिशय लाभदायक असल्याने फुलांना महत्व वेगळेच असते. यानंतर ५ आणि ६ डिसेंबरपासून दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर या फुलांना मागणी वाढली आहे. अशातच आता पुढील तीन महिने उत्सवाची रांग लागणार असल्याने या फुलांचे दर पुढील काही महिन्यांमध्ये चढे राहणार असल्याचे फूलव्रिकेत्यांनी सांगितले. (वार्ताहर)
देवाच्या भक्तीला भाववाढीची भीती
By admin | Published: November 23, 2014 10:16 PM