देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील मुंबईस्थित देवरुखकर बंधूंनी काेराेनाच्या काळात मदतीचा हात दिला आहे़ गावातील एक हजार ग्रामस्थांसाठी गाेळ्या, पल्स ऑक्सिमीटर व थर्मामीटर भेट म्हणून दिले आहेत़
काेराेनाच्या काळात ग्रामस्थांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी परेश देवरुखकर, डाॅ. अमित ताठरे यांच्या प्रयत्नातून मुंबईस्थित वृंदा छापवाले, मनोज देवरुखकर, विवेक देवरुखकर आणि अमोल देवरुखकर यांनी ही मदत दिली आहे़ धामणी गावातील गावडेवाडी, जोगलेवाडी, सुतारवाडी, घाणेकरवाडी, टाकळेवाडी, गवळीवाडी, काकवळवाडी, पाष्टेवाडी, ब्राह्मणवाडी, यादववाडी, बौद्धवाडी, सोनारवाडीमधील एक हजार लोकांना गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी डाॅ. अमित ताठरे, परेश देवरुखकर, नीलेश जोगले, प्रवीण करंडे, रोशन पाष्टे, प्रणित घाणेकर, प्रणित काकवळ, अमित सकपाळ, समीर जोगले, संदेश जोगले, शुभम जोगले, स्वप्निल जोगले, आदित्य धामनाक उपस्थित होते.