देवरुख : अभिरुची, देवरुख आयोजित स्वरोत्सव हा वार्षिक संगीत महोत्सव दि. २७ ते २९ डिसेंबर २०१४ या काळात देवरुख येथील पित्रे प्रायोगिक कला मंच येथे दररोज रात्री ९.३० वाजता होणार आहे. अभिजात संगीताने नटलेल्या या महोत्सवात शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम गायन आणि वाद्यसंगीताचाही समावेश या महोत्सवात करण्यात आला आहे. अभिरुची स्वरोत्सवचे हे बारावे वर्ष असून, कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत.स्वरोत्सवाची सुरुवात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जयतीर्थ मेगुंडी यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. मेगुंडी यांना भारतरत्न, पं. रवीशंकर, पं. भीमसेन जोशी, लता मंगेश यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. दि. २८ रोजी उस्ताद सुलतान खान यांचे पुतणे उस्ताद दिलशाद खान यांच्या सारंगी वादनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. स्वर वादनाचे शिक्षण त्यांनी बालवयातच उस्ताद गुलाब खान यांच्याकडे घेतले. त्यांनी आपली पहिली मैफल दहाव्या वर्षी जोधपूर आकाशवाणी महोत्सवात रंगवली. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, दिल्ली शाखा ,पुणे प्रस्तुत वैभव नाट्यसंगीताचे या नाट्यसंगीतावर आधारित कार्यक़्रमाला यावर्षी स्वरोत्सवाची सांगता होणार आहे. नटी सूत्रधार, गायक-गायिका व साथीला तबला-आॅर्गन अशा संचात सादर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये निवडक मराठी नाट्यपदांचा समावेश आहे. जयराम पोतदार हे या कार्यक्रमाचे निर्माते आहेत.कल्याणी पोतदार या गायिका म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच अभय जाबडे, गीतांजली जेधे यांचाही या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे.या दिग्गजांच्या मैफिलीचा संगीतप्रेमींनी आस्वाद घ्यावा आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अभिरूची, देवरूखतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)शास्त्रीय, उपशास्त्रीय सुगमसंगीतासह गायन आणि वाद्यसंगीताचाही समावेश.किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जयतीर्थ मेगुंडी यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार स्वरोत्सवाची सुरुवात.कल्याणी पोतदार आणणार मैफिलीत रंगत.
देवरुखात दिग्गजांची मैफल
By admin | Published: December 26, 2014 10:43 PM