असगोली : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी असली तरी गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून अन्य सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.तालुक्यातील कोंडकरूळ, रानवी, भातगाव, तळवली, निगुंडळ, पालपेणे, नरवण, पिंपर, मळण, शीर, वेळणेश्वर, जामसुत, मासू, अडूर, काजुर्ली, शिवणे, गोळेवाडी, मुंढर, पडवे, काताळे, उमराठ, कुडली, पेवे, खामशेत, साखळी बुद्रुक, साखरी आगर, कोळवली, गिमवी, कोसबीवाडी आदी २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीनंतर आमदार जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जुन्या-नव्यांची सांगड घालावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून राजेंद्र आरेकर यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गाव पातळीवरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित बैठका सुरू झाल्या आहेत.राष्ट्रवादी अडसर ठरेल?राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र असले तरी गुहागरात मात्र राष्ट्रवादी शिवसेनेला अडसर ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला बळकटी मिळाली आहे.लढत तीन पक्षात?भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या माध्यमातून वाडी-वस्तीवर बैठका सुरू केल्या आहेत. केंद्रशासनाच्या योजनांच्या जोरावर अधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. खरी लढत ही शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप या तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार हे निश्चित आहे. त्यातही तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून रिंगणात उतरल्यास चित्र बदलेल.
गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुळवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 2:50 PM
gram panchayat Elecation Ratnagiri- असगोली तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी असली तरी गुहागरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून अन्य सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
ठळक मुद्देगुहागरात ग्रामपंचायत निवडणुकीची धुळवड२९ ग्रामपंचायतींसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू