असगोली : गुहागर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याहून एनडीआरएफ पाच बटालियनचे पथक दाखल झाले होते. मात्र, प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थीच नसल्याने गुहागर येथे आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावरच रंगत असल्याचे दिसत आहे. -राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी पुण्यातील एनडीआरएफ पाच बटालियनचे पंधराजणांचे पथक आले होते. महसूल विभाग या प्रशिक्षणाचे आयोजक होते. मात्र, आलेल्या पथकासमोर प्रशिक्षणार्थीच नसल्याने या पथकाने नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षणासाठी आवश्यक व्यवस्थाही केली नसल्याने महसूल विभागातील तीन कर्मचारी, दोन मंडल अधिकारी, तीन तलाठी, एक उपनिरीक्षक, होमगार्ड प्रमुख सुधाकर कांबळे व त्यांचे सहकारी होमगार्ड पाच यांनाच तेथे बसवून प्रशिक्षण आटोपते घेण्यात आले. तरीही उपस्थितांना या पथकाने प्रशिक्षण देऊन आपली कामगिरी उत्तम पार पाडली. एनडीआरएफ पाच बटालियनचे प्रमुख सबइन्स्पेक्टर एस. के. सिंग यांनी संपूर्ण नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम होऊनही याबाबत पंचायत समिती प्रशासनालाही कल्पना नव्हती. एकंदरीतच शासन आपत्तीच्या वेळी किती सज्ज आहे, हे दिसून आले.या प्रशिक्षणामध्ये सकाळच्या सत्रात भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीविषयी कोणती खबरदारी घ्यावी, वादळावेळी निर्माण होणाऱ्या आपत्तीवेळी कोणते कार्य करावे, पूरसदृश स्थितीत कोणती उपाययोजना असावी, याची तर दुपारच्या सत्रात रासायनिक पदार्थ, शत्रू आक्रमक तसेच रेडिओलॉजीकल दुर्घटनेवेळी आपत्ती व्यवस्थापनाने जनतेला सहकार्य कसे करावे, याची माहिती दिली.मात्र, यावेळी आवश्यक प्रशिक्षणार्थी नसल्याने हे प्रशिक्षण केवळ कागदावरच रंगत असल्याचा अनुभव यावेळी आला. (वार्ताहर)प्रशिक्षण कार्यक्रमाचा बोजवाराजिल्ह्यात सर्वत्र आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने जागृती दाखवली. सर्व ठिकाणी हे आपत्ती व्यवस्थापन पार पडले. मात्र, गुहागरात याबाबत वेगळाच अनुभव आला. गुहागरमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या पथकासमोर प्रशिक्षणार्थीच नसल्याचे दृश्य अवाक् करणारे होते. पावसाळा सुरू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व विभाग कामाला लागले आहेत. मात्र, गुहागरात प्रशिक्षणच संबंधिताना मिळाले नसेल तर... हे चित्र बदलणे आवश्यक आहे.
गुहागरात आपत्ती व्यवस्थापन कागदी
By admin | Published: June 12, 2015 10:35 PM