खेड : तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पोयनार धरणाचे काम सध्या बंद करण्यात आले आहे. तांत्रिक त्रुटीमुळे हे काम बंंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ ३५ कोटी रूपये खर्चूून हे काम करण्यात येणार आहे़ मात्र, अद्याप पुनर्वसनाचे काम सुरू झाले नसल्याने विस्थापितांची अडचण झाली आहे. प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपासाठी गुरूवारी आलेले उपजिल्हाधिकारी राऊत ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे माघारी गेले. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली.आता ही बैठक १५ दिवसांनंतर घेण्यात येणार असून, यामध्ये उभय बाजूंनी तोडगा काढणे शक्य होणार असल्याची माहिती धरण प्रकल्पाचे अधिकारी खेडेकर यांनी दिली आहे.पोयनार धरणासाठी राज्य सरकारने ३५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. यातील केवळ ४० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित काम निधीअभावी अनेकवेळा बंद करण्यात आले होते़ आता हे काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम मंदावले होेते. आता अडचणी दूर झाल्या आहेत.़ यामुळे ठेकेदार कंपनी येत्या १५ दिवसात काम सुरू करणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. या धरणामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. परिसरातील शेतकरी आपल्या जमिनीतून चांगले पीक घेऊ शकणार आहेत. सिंचनाच्या दृष्टीने सरकारने आता शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्याने याच धरणातील पाण्यामुळे अनेक प्रकारची पिके शेतकऱ्यांना काढणे शक्य होणार आहे. धरणामुळे पोयनार गावातील ९० घरे, फुरूस गावातील १०६ घरे आणि धामणी गावातील ३३ घरे विस्थापित होणार आहेत़ २२९ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे.़ या सर्वांना भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. याकरिता रत्नागिरी येथून कूळवहीवाट विभागाचे उपजिल्हाअधिकारी राऊत आणि इतर अधिकारी यांनी गुरूवारी पोयनार गावाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार कारवाई सुरू केली असता ग्रामस्थांनी त्यास विरोध केला़ आम्हाला हवे त्या प्रमाणात भूखंडाची मागणी ते करीत होते. यास अधिकाऱ्यांनी मात्र विरोध केला. तसे होणार नाही, असे सांगत सरकारी नियमानुसार या भूखंडाचे वाटप होणार असल्याची माहिती विस्थापितांना दिली़ मात्र, तासभर झालेल्या चर्चेअंती उभयतांमध्ये तोडगा न निघाल्याने ही बैठक गुंडाळावी लागली. अखेर १५ दिवसांनंतर पुन्हा बैैठक घेण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत या धरणाचे काम पूर्ण करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या धरणामुळे अनेकांची तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीची कामे या धरणातील पाण्यावर होणार आहेत. यामुळे दुबार पिके काढणे शक्य होणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. खेड तालुक्यातील पोयनार धरणाखाली गेलेल्या गावांमधील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने नाराजी आहे. अशा प्रकल्पांचा सिंचनासाठी किती उपयोग होतो, हा प्रश्न वेगळा असला तरी छोट्या धरणांमधून येणारे पाणी व त्यातून येणारे उत्पन्न, सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी किती होतो, हे पाहाणेही महत्त्वाचे ठरेल. (प्रतिनिधी)राज्य सरकारकडून 35 कोटी मंजूरखेड तालुक्यातील लघुपाटबंधारे योजनेंतर्गत गाजलेला प्रश्न.पंधरा दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीकडे लक्ष.पोयनार धरणामुळे २२९ घरांचा प्रश्न ऐरणीवर.धरणे उभारण्यापूर्वी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा.आधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प या भूमिकेचे होतेय उल्लंघन. यापूर्वीच्या चर्चेतून तोडगा न निघाल्याने पुन्हा बैठक.शेतकऱ्यांना पीक घेणे शक्य, मात्र नवे धोरण राबवा.
धरण भूखंड वाटपाची चर्चा निष्फळ
By admin | Published: March 22, 2015 11:12 PM