शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
2
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
3
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
4
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
5
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
6
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
7
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
9
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
10
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
11
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
12
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
13
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
14
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
15
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
17
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
19
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
20
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मते मिळाली?.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 5:50 PM

भाजप आणि काँग्रेसची पाटी कोरीच राहणार?

रत्नागिरी : पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी राजकीय समीकरणे वेगळी होती. मित्रपक्ष वेगवेगळे होते. त्यात पाचपैकी चार जागा शिवसेनेने जिकल्या होत्या आणि एक जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता गतवेळीच्या समीकरणांची चर्चा प्राधान्याने सुरू झाली आहे.वर्ष २०१९ मध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकाचा, तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता; पण आता या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आपलीच ताकद अधिक आहे, हे दाखवण्यासाठी या दोन्ही पक्षांतील सर्व गटांना लढत द्यावी लागणार आहे. उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) अशाच लढती जिल्ह्यात होणार आहे.पक्ष, चिन्हात बदलगत निवडणुकीच्या तुलनेत आमदार राजन साळवी आणि आमदार भास्कर जाधव यांच्या पक्षाच्या नावात आणि चिन्हात बदल झाला आहे. ते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या नावाने व धनुष्यबाणाऐवजी मशाल चिन्हावर निवडणूक लढवतील.भाजप आणि काँग्रेसची पाटी कोरीच राहणार?गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीत चार जागा राष्ट्रवादीने, तर एक जागा काँग्रेसने लढवली होती. यावेळी काँग्रेसला कुठला मतदारसंघ सुटण्याची शक्यता आता तरी दिसत नाही. तीच स्थिती भाजपची आहे. गतवेळी भाजपला पाचपैकी एकही जागा मिळाली नव्हती. याहीवेळी शक्यता नाही. त्यामुळे या दोन पक्षांची पाटी कोरीच राहणार आहे.काय होते विधानसभानिहाय चित्र (टॉप उमेदवार)?विधानसभा  -   उमेदवार (कंसात मते) - तेव्हाचा पक्ष कोणता?रत्नागिरी - उदय सामंत (१,१८,४८४) - शिवसेनारत्नागिरी - सुदेश मयेकर (३१,१४९) - राष्ट्रवादीराजापूर - राजन साळवी (६५,४३३) - शिवसेनाराजापूर - अविनाश लाड (५३,५५७) - काँग्रेसचिपळूण - शेखर निकम (१,०१,५७८) - राष्ट्रवादीचिपळूण - सदानंद चव्हाण (७१,६५४) - शिवसेनागुहागर - भास्कर जाधव (७८,७४४) - शिवसेनागुहागर - सहदेव बेटकर (५२,२९७) - राष्ट्रवादीदापोली - योगेश कदम (९५,३६४) - शिवसेनादापोली - संजय कदम (८१,७८६) - राष्ट्रवादी

सध्याच्या गणितानुसार पक्षनिहाय संख्याबळभाजप : ००शिंदे सेना : ०२अजित पवार गट : ०१कॉंग्रेस : ००राष्ट्रवादी : ००उद्धव सेना : ०२

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024