शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

चिपळुणात कचरा टाकण्यावरुन वाद, वृद्धावर केले कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 6:52 PM

कचरा टाकायचा नाही, जमीन आमची आहे, असे म्हणत दमदाटी करत वार केले.

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे कुंभारवाडी येथे कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादावादीत ४९ वर्षीय वृद्धावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद रामचंद्र चव्हाण (रा. सावर्डे, कुंभारवाडी, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात दिली. ही घटना काल, गुरुवारी घडली.रामचंद्र चव्हाण हे कोयत्याने नारळाच्या झावळांचे हिर काढून कचरा टाकत होते. त्यावेळी मारुती चव्हाण, महेश चव्हाण, रोहित चव्हाण (सर्व रा. सावर्डे, कुंभारवाडी, चिपळूण) यांनी कचरा टाकायचा नाही, जमीन आमची आहे, असे म्हणत दमदाटी केली. तसेच मारुती चव्हाण कोयता घेऊन रामचंद्र चव्हाण यांच्या अंगावर धावून गेला. याचवेळी महेश चव्हाण याने त्याच्या हातातील कोयता ओढून घेत रामचंद्र चव्हाण यांच्या डाव्या हाताच्या तीन बोटांवर व डोक्यात मारुन जखमी केले.रामचंद्र चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन मारुती, महेश, रोहित या तिघांवर भारतीय दंड विधान कलम ३२४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस