रत्नागिरी : सुवर्ण राजस्व अभियानातंर्गत जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यात हे अभियान गावागावात पोहोचविण्यात यश आले असून, १५ हजार दाखल्याचे वितरण करण्यात आले. अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयामुळे अभियान यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.राजस्व अभियानातंर्गत विविध दाखले वाटपाचा शेवटचा टप्पा तसेच मुस्लिमांसाठी जाहीर केलेल्या पाच टक्के आरक्षण दाखल्याचे वितरण राज्यात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात शुभारंभ झाला. मिस्त्री हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सामंत बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, तहसीलदार मारूती कांबळे, अल्पसंख्याक सेलचे राज्य उपाध्यक्ष बशीर मुर्तुझा, शिरगावचे सरपंच रज्जाक काजी, रफीक मुकादम, नगरसेवक उमेश शेट्ये, अलिमियाँ काझी आदी उपस्थित होते.जिल्हावासीयांसाठी चालता फिरता दवाखाना स्वरूपात ७४ लाखांच्या १७ रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विकासकामात प्रगतीपथावर असून, जिल्ह्यातही अनेक विकासकामे राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. विद्यार्थी व नागरिकांना आवश्यक असणारे दाखले व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची एकाच ठिकाणी बसून पूर्तता करण्यात येत आहे. शासकीय सुट्यांच्या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी दाखले वितरणाच्या कामात व्यस्त असल्याचे उकर्डे यांनी सांगितले.मुस्लिम बांधवांसाठी देण्यात येणाऱ्या पाच टक्के आरक्षण दाखल्याचे वितरण रत्नागिरीत आजपासून सुरू झाले आहे. मिस्त्री हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या कर्ला, फणसोप, इब्राहीमपट्टण मार्गावरील विद्यार्थ्यांसाठी शालेय फेऱ्या सुरू करण्याची सूचना मुर्तुझा यांनी पालकमंत्री सामंत यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्याना दाखले, नागरिकांना रेशनकार्डचे वितरण पालकमंत्री सामंत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मिस्त्री स्कूलतर्फे पालकमंत्री सामंत, प्रांताधिकारी उकार्डे, तहसीलदार मारूती कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)सुवर्ण राजस्व अभियानांतर्गत शेवटच्या टप्प्यात मिस्त्री हायस्कूलमध्ये लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, तहसीलदार मारूती कांबळे, बशीर मुर्तुझा, रफीक मुकादम उपस्थित हेते.
रत्नागिरी अभियानाव्दारे दाखल्यांचे वितरण
By admin | Published: September 07, 2014 10:47 PM