रत्नागिरी : सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या वाटद-मिरवणे येथील तरुण विकास मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवातीला महापुरुषांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. निसर्ग संवर्धनाचे प्रतीक म्हणून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक अमोल बारगुडे यांनी करताना, शैक्षणिक फंडाचे उद्दिष्ट व कार्य याविषयी मार्गदर्शन केले. मंडळाचे सचिव हरिश्चंद्र पालये, खजिनदार रमेश पातये, सल्लागार केशव पालये यांच्या हस्ते वाडीतील ७४ विद्यार्थ्यांना (अंगणवाडी ते पदवी शिक्षण) शालेय बॅग, वही-पेन व रोपे वितरित करण्यात आली. या वेळी मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा पालये यांनी विद्यार्थ्यांना ‘आजचे शिक्षण व आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन ढवळे, मंडळाचे सदस्य, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल बारगुडे याने केले.