लांजा : ग्राम दत्तक योजनेंतर्गत लांजा पोलीस स्थानकातर्फे लांजा शहरातील धुंदरे हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. येथील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
लांजाचे उपविभागीय अधिकारी निवास साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम दत्तक योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या धुंदरे गावामध्ये कोराेनापासून बचावासाठी उपाययोजना, लसीकरणाबाबत जनजागृती करुन नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच दत्तक घेण्यात आलेल्या धुंदरे गावामधील गरजू बारा कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. मुस्लिम वेल्फेअर सोसायटीमार्फत अन्नधान्य किट देऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, लांजा पोलीस स्थानकाचे गोपनीय अंमलदार नितीन पवार, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे कार्याध्यक्ष अकील नाईक, सचिव राजू नाईक, सदस्य सर्फराज मुकादम, संस्थेचे युवा अध्यक्ष नसिर मुजावर, धुंदरे गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.