चिपळूण : येथील नगर परिषदेतर्फे दिव्यांगांना ५ टक्के राखीव निधीतून अनुदानाचे वाटप करण्यात आले. शहरातील एकूण ६३ दिव्यांगांना २० लाख ११ हजार ७६५ रुपये इतके अनुदान वस्तूरूपात वाटप करण्यात आले.
दरवर्षी एकूण अर्थसंकल्पाच्या ५ टक्के राखीव निधीतून या अनुदानाचे वाटप केले जाते. चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्या हस्ते या अनुदानाचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रायोगिक तत्वावर ५ दिव्यांगांनाच मंजुरीचे पत्र देण्यात आले. उर्वरित ५८ दिव्यांगांच्या घरी पत्र पोहाेचविण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्य सभापती शशिकांत मोदी, नगरसेवक आशिष खातू, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, मिळकत व्यवस्थापक अनिल राजेशिर्के, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
------------------------------------
चिपळुणातील दिव्यांगांना नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्या हस्ते अनुदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी शशिकांत मोदी, आशिष खातू उपस्थित होते.