दापाेली : दापोली पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत महाआवास अभियान पुरस्कार २०२०-२०२१ तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्काराचा प्रथम विजेता केळशी गट ठरला. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांक कोंढे, द्वितीय क्रमांक करजगाव, तृतीय क्रमांक विजेते मुरुड यांना देण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट घरकुल प्रथम क्रमांक मंगला भिकाजी बाईत, द्वितीय क्रमांक नर्मदा धोंडू कोळंबे, तृतीय क्रमांक गोविंद दौलत फागे यांना देण्यात आला. राज्य आवास योजना सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम क्रमांक पालगडने पटकावला. राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीत प्रथम क्रमांक तेरे वायंगणी, द्वितीय विसापूर, तृतीय क्रमांक भोपण ग्रामपंचायतीने पटकावला. राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट घरकुलचा प्रथम क्रमांक शिल्पा शैलेश कदम, द्वितीय क्रमांक ललिता धोंडू तांबे, तृतीय क्रमांक वीरसेन रमेश घाडगे यांना देण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला रत्नागिरी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रेश्मा झगडे, दापोली गटविकास अधिकारी दिघे, दापोली पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे, दापोली शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य अनंत करबेले, पंचायत समिती सदस्या वृषाली खडपकर उपस्थित होते.