वाहतूककोंडी
देवरुख : कोरोनाचे रुग्ण कमी होताच प्रशासनाकडून नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी शहरातील बाजारपेठेत गर्दी होत आहे. बाजारपेठेतील वाहतूककोंडीची समस्या कित्येक वर्षापासून कायम आहे. यावर आतापर्यंत उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात वाहतूककोंडी वाढली आहे.
माजी सैनिकांना संधी
रत्नागिरी : जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी १ ते २१ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. हे अर्ज www.maharddzp.com या संकेतस्थळावर स्वीकारले जाणार आहेत.
पावसाचा इशारा
रत्नागिरी : हवामान खात्याने ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस जोरदार पडत असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. ऐन गणेशोत्सवात पावसाच्या शक्यतेने गणेशभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
इतिहास कार्यशाळा
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान व इतिहास या विषयांवरील आधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सेवासाधना प्रतिष्ठान केतकी तालुका चिपळूण आणि अमरजित चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित केली होती.