चिपळूण : खेर्डी येथील विनोद भुरण मित्रमंडळातर्फे खेर्डीमधील विलगीकरण कक्षातील कोरोना रुग्णांना स्टिमरचे वाटप करण्यात आले. यावेळी खेर्डीच्या सरपंच वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, सदस्य विनोद भुरण, बाळा दाते उपस्थित होते.
लोकशाही दिन
रत्नागिरी : सोमवारी (दि.२१) महिला लोकशाही दिन साजरा होणार आहे. दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो.
बसफेरीसाठी निवेदन
खेड : कोरोनाच्या निर्बंध काळात बंद करण्यात आलेली खेड-वडगाव एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन दळवी यांनी परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांना दिले आहे.
धबधब्यांवर प्रवेशबंदी
राजापूर : तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा असलेला धोका लक्षात घेऊन या धबधब्यांवर प्रवेशासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
पाण्याचे नमुने घेतले
गुहागर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांनी बुधवारी गुहागरच्या समुद्रावर येऊन पाण्याचे नमुने घेतले. समुद्रकिनाऱ्यावर जाऊन त्यांनी तवंगमिश्रित पाण्याचे नमुने घेतले.
संबंधित बाधित क्षेत्र जाहीर करा
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नव्याने करण्यात आलेले कंटेन्मेंट झोन हे चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे ते तातडीने रद्द करावेत, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. या समस्येबाबत त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठकही घेतली.