रत्नागिरी : शहरातील संपर्क युनिक फाऊंडेशनतर्फे लॉकडाऊनमुळे शहर व परिसरातील नाक्यांवर भर उन्हात तपासणीसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी संपर्क युनिक फाैंडेशन संस्थेतर्फे सेवा देण्यात येत आहे. सध्या कोरोना काळात लसीकरण, कोरोनाबाबत जनजागृती, रुग्णांना समुपदेशन आदी कामे करण्यात येत आहेत. लॉकडाऊनसाठी पाेलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस व पोलीसमित्र भर उन्हात सेवा बजावत आहेत. पोलीस व पोलीस मित्रांसाठी थोडासा दिलासा म्हणून पाण्याच्या बाटल्या, सरबत बाटली व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. कारवांची वाडी ते भाट्ये पूल, तसेच परटवणे आदी भागात गस्त करणाऱ्या शंभर पोलिसांना शीतपेय, बिस्किटे, पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संपर्क युनिक फाैंडेशनचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, रुग्ण मदत केंद्र प्रमुख ईस्माईल नाकाडे, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, जिल्हा संघटक जमीर खलफे, शहर संघटक इरफान शहा उपस्थित होते.