शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

जिल्हा बँकेच्या खातेदारांचा मोर्चा

By admin | Published: November 16, 2016 10:28 PM

तीव्र असंतोष : ग्रामीण भागाचे अर्थकारण कोलमडल्याने संताप

चिपळूण : शासनाच्या धोरणानुसार १००० व ५०० रुपयांच्या नोटा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकारल्या जात नसल्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण अडचणीत आले आहे. जनतेची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या संतप्त ग्राहकांनी बुधवारी सकाळी बँकेच्या चिपळूण शिवाजी चौक शाखेवर मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप- भोसले व तहसीलदार जीवन देसाई यांना निवेदन दिले.चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे व ग्रामीण लघुउद्योजकांचे व ग्रामीण कारागीरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सभासदांनी आज मोर्चा काढला. त्यांनी प्रथम ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याबद्दल चिपळूण शिवाजी चौक येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा कार्यालयावर धडक दिली. तेथे कर्जाचे हप्ते भरण्यासाठीही नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे शाखा अधिकारी यांनी सांगितले. ग्रामीण भागात बँकेकडून कर्ज घेऊन शेती व उद्योग, व्यवसाय केले जातात. त्या कर्जाचे हप्ते जिल्हा बँकेत भरले जातात. परंतु, जिल्हा बँकेत नोटा स्वीकारल्या जात नाहीत. केंद्र शासनाने सर्व बँकातून ३० डिसेंबरपूर्वी रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हा बँक नोटा का स्वीकारत नाही, असा प्रश्न या सर्व खातेदारांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागातील अनेक खातेदारांची इतर बँकांत बचत खाती नाहीत. अशा परिस्थितीत या ग्राहकांनी नोटा भरायच्या कुठे? शिवाय कर्जाचे हप्ते न फेडल्याने दंड व्याज वाढणार. त्यामुळे या ग्राहकांना मानसिक त्रास होत आहे. १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची जिल्हा बँकेला परवानगी द्यावी, अशी आपली मागणी असून, ती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे कळवावी, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना देण्यात आले. सकाळी बँक खातेदार ग्राहकांच्या वतीने प्रभाकर आरेकर, अशोक कदम, रघुनाथ कुंभार, शंकर येलोंडे, रामचंद्र पडवले, हनुमंत पवार, दिलीप गमरे, शिवाजी गोटल, अंकुश कदम, राकेश जाधव, शिवाजी चिले, कालवे, श्रीधर शिंदे यांच्यासह विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, पतसंस्थांचे संचालक तसेच जिल्हा बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी चिपळूणचे उपविभागीय अधिकारी भोसले व तहसीलदार देसाई यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)प्रांत व तहसीलदारांना दिले निवेदन.१००० व ५०० नोटा जिल्हा बँक स्वीकारत नसल्याने अडचणीत वाढ.ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले.ग्रामीण जनतेची होतेय ससेहोलपट. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये १००० व ५००च्या नोटा स्वीकारण्याची मागणी.खातेदार, पतसंस्था, खविसंचे व सोसायट्यांचे संचालक उतरले रस्त्यावर.