शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला लवकरच चढणार नवा साज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 12:40 PM

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा- रत्नागिरी पॅसेंजरचे रूपडे पालटणार आहे. देखभाल दुरुस्तीसह वेगवर्धन, सेक्शनमध्ये लवकर क्लिअरन्स मिळणे, ...

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा-रत्नागिरी पॅसेंजरचे रूपडे पालटणार आहे. देखभाल दुरुस्तीसह वेगवर्धन, सेक्शनमध्ये लवकर क्लिअरन्स मिळणे, अशा सुविधांबराेबरच मेमू प्रकारातील ही गाडी असेल. त्यामुळे या गाडीला नवा साज चढणार आहे. मात्र, गाडीचे रूपडे बदलताना प्रवाशांच्या आसन क्षमतेत घट केली आहे.कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर दादर-रत्नागिरी पॅसेंजर (५०१०३/५०१०४) ही गाडी धावत आहे. कोरोना काळापासून ही गाडी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर करण्यात आली. दोन वर्षांपूर्वीच पूर्वीच्या निळ्या पांढऱ्या रंगसंगतीमधील जुन्या गाडी ऐवजी लाल रंगातील एलएचबी श्रेणीमधील दीनदयाळ प्रकारच्या कोचसह धावत आहे. मात्र, आता ही गाडी आणखी नव्या रंगरूपात धावणार आहे.

दिवा-रत्नागिरी ही गाडी लाल-करड्या रंगसंगतीमधील एलएचबी रेकऐवजी मेमू प्रकारात धावणार आहे. यासाठी आयसीएफ कपूरथळा येथील कारखान्यात ‘रेक’ तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. दिवा ते रत्नागिरी मार्गावर सध्या धावत असलेल्या गाडीला रिप्लेस करण्यासाठी मेमू गाडी मध्य रेल्वेच्या हद्दीत दाखल झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या मेमू गाडीसाठी आवश्यक असलेले सर्व डबे दाखल झाल्यानंतर ही गाडी सध्याच्या गाडी ऐवजी चालवली जाणार आहे.

वेळ वाचणारदिवा ते रत्नागिरी गाडी ती धावणार असलेल्या दिशेला विद्युत इंजिन जोडून चालवली जात आहे. मात्र, मेमू गाडीला दोन्ही बाजूला इंजिन असल्यामुळे सध्या ‘लोको रिव्हर्सल’साठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच या प्रकारातील रेक पंधरा दिवसांतून एकदा तांत्रिक देखभालीसाठी पाठवला तरी चालतो. सध्याच्या गाडीची आठवड्यातून एकदा देखभाल करावी लागत आहे.

आसन क्षमता घटणारदिवा-रत्नागिरी गाडीतील आसन रचना गर्दीच्या हंगामात प्रवाशांसाठी लाभदायक ठरत होती. सीटच्या वरही बसण्याची व्यवस्था असल्याने गर्दीच्या वेळी खाली जागा नाही मिळाली तर प्रवासीवर जाऊन बसू शकत होते. मात्र, नव्याने येणाऱ्या मेमूमध्ये अशी व्यवस्था ठेवण्यात येणार नाही. त्यामुळे आसन क्षमता कमी हाेणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे