शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सह्याद्री विकास समितीचे निसर्गकार्य ईश्वरी : सोमण

By admin | Published: December 17, 2014 9:39 PM

‘निसर्गवेध’ची सांगता : खगोलतज्ज्ञ सोमणांच्या माहितीपटात रंगले शेकडो विद्यार्थी

चिपळूण : ‘उत्सव निसर्गाचा आणि शोध कलागुणांचा’ या संदेशाने संपन्न होणारा ‘निसर्गवेध २०१४’ हा उपक्रम किंवा गेले १७-१८ वर्षे चाललेले सह्याद्री विकास समितीचे निसर्ग कार्य हे ईश्वरी कार्यच आहे’, असे उद्गार सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ दा. कृ . सोमण यांनी काढले. खेर्डी - चिंचघरी (सती)च्या सभागृहामध्ये ‘निसर्गवेध २०१४’ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.सती चिंचघरी कॉलेजला हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अपूर्व उत्साहाचा ठरला. सकाळी ७ वाजल्यापासूनच चिपळूण तालुक्यातील विविध महाविद्यालयातले संघ ‘निसर्ग गीत’ स्पर्धेसाठी आपापली वाद्ये घेऊन उत्साहात कॉलेजच्या आवारात दाखल होत होते. सकाळी ९ वाजता प्राचार्य पी. व्ही. पाटील यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. पांडुरंग सोलकर, दीपक संकपाळ आणि मेघना गोखले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. ‘निसर्ग आणि अवकाश’ या विषयावर अत्यंत उद्बोधक असे व्याख्यान आणि चित्रफितीमध्ये तरुणाई रमून गेली.यानंतर अनिकेत कानिटकर यांनी ाक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन केले. विकास कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचित पेडामकर, अजय कदम, उपक्रम प्रमुख अक्षय सोलकर, स्पर्धाप्रमुख वरद बेंदरकर, हितेश उतेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.विजेते स्पर्धक : निबंध स्पर्धा : प्रथम सलोनी नागनाथ बागडे (न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, खेर्डी - चिंचघरी), द्वितीय शुभांगी सुनील धुमक (इन्स्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सावर्डे, तृतीय श्रद्धा अनंत उतेकर (सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय, चिपळूण), उत्तेजनार्थ सुरभी दत्ताराम कदम (एस. पी. एम. ज्युनिअर कॉलेज भोगाळे, चिपळूण), उत्तेजनार्थ रविना विनायक शिंदे (कॉलेज आॅफ फार्मसी, सावर्डे). वक्तृत्व स्पर्धा : प्रथम साक्षी महेश गांधी (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण), द्वितीय प्रणव विनायक माळी (आस. सी. काळे ज्युनिअर कॉलेज, पेढे परशुराम), तृतीय सायली ब. तिवारी (कॉलेज आॅफ फार्मसी, सावर्डे), उत्तेजनार्थ रोहिणी विजय जाधव (ठाकरसी ज्युनिअर कॉलेज आॅफ आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स, रामपूर, ता. चिपळूण), उत्तेजनार्थ मासुमा इकबाल वांगडे (एच. डी. ए. हायस्कूल अ‍ॅण्ड दलवाई ज्युनिअर कॉलेज, कालुस्ते), उत्तेजनार्थ प्रतीक्षा सुनील धायगुडे (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण).रांगोळी स्पर्धा : प्रथम नीता गंगाराम भागडे (कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे), द्वितीय ओंकार प्रकाश बुरुंबाडकर (आर. सी. काळे ज्युनिअर कॉलेज, पेढे - परशुराम), तृतीय सायली संतोष आयरे (आर. सी. काळे ज्युनिअर कॉलेज, पेढे - परशुराम, ता. चिपळूण), उत्तेजनार्थ मंगेश प्रकाश शिगवण (सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट, सावर्डे).चित्रकला स्पर्धा : प्रथम अमेय चाळके (सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट, सावर्डे), द्वितीय चारुदत्त धुमाळ (सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट, सावर्डे), तृतीय नीलेश दुर्गावली (सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट, सावर्डे), उत्तेजनार्थ पद्मजा विभाकर वाचासिद्ध (एस. पी. एम. ज्युनिअर कॉलेज, भोगाळे, चिपळूण).निसर्ग गीत स्पर्धा : प्रथम मयुर मोहिते व सहकारी (गुरुकुल कॉलेज, चिपळूण), द्वितीय गायत्री मोहिते व सहकारी (न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, खेर्डी - चिंचघरी (सती), तृतीय श्रुतिका दळवी व सहकारी (सी. ए. वसंतराव लाड ज्युनिअर कॉलेज, अलोरे) (प्रतिनिधी)