विहार तेंडुलकर
रत्नागिरी ,11 : दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा नारा दिल्याने फटाके विक्रेत्यांचे फटाके ‘दिपावली’पूूर्वीच फुटले आहेत.
दिपावली सण आठवड्यावर आला असताना अजूनही बाजारपेठेत फटाके विक्रीस लावण्यात आलेले नाहीत. दरवर्षी दिवाळी सणापूर्वी आठवडाभर अगोदरपासून फटाके विक्रीला जोर येतो. पण शासनाने ‘फटाकेमुक्त दिपावली’चा नारा दिल्याने सर्वच फटाकेविके्रेते चिंताग्रस्त आहेत.
दरवर्षी प्रत्येक व्यापारी लाखोंच्या घरात फटाक्यांची खरेदी करून ते विक्रीसाठी मांडत असतो आणि लगीनसराई, दिपावली वा निवडणुका हे फटाक्याच्या विक्रीसाठी हमखास हंगाम मानले जातात. त्यातही दिपावलीच्या काळातच फटाक्यांची प्रत्येक व्यापारी लाखोंच्या घरात उलाढाल करतो.
यंदाही काही दिवसांपूर्वीच व्यापाºयांनी फटाके खरेदी केले आहेत. अजूनही बाजारपेठेत म्हणावी तशी गर्दी नसल्याने व्यापाºयांनी फटाके विक्रीस खुले केले नव्हते. मात्र शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिपावली’ची घोषणा केली आणि या व्यापाºयांच्या पायाखालची वाळूच सरकली. दिपावलीसाठी आणलेला लाखो रुपयांचा माल तसाच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
याबाबत काही व्यापाºयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नजीकच्या काळात यावर तोडगा निघेल असे वाटत नाही. त्यामुळे एवढ्या फटाक्यांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे. शासनाने अचानक हा निर्णय घेण्यामागे कारण तरी काय? आणि आमच्या होणाºया नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल या व्यापाºयांनी केला आहे.
दिपावली सण वगळता अन्य काळात फटाक्यांची म्हणावी तेवढ्या प्रमाणात उलाढाल होत नाही. फराळ आणि फटाक्यांची दिपावलीतच मोठी उलाढाल होते. आता फटाक्याच्या विक्रीवरच निर्बंध आल्याने हा सर्व खर्च आमच्याच माथी पडणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.निसर्गप्रेमींकडून स्वागतदरम्यान, शासनाच्या या निर्णयाचे निसर्गप्रेमींनी स्वागत केले आहे. दिपावलीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. त्यावर कुठेतरी निर्बध येणे गरजेचे होते. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया निसर्गप्रेमींनी व्यक्त केल्या असून शासनाने असा अचानक निर्णय घेणे गैर आहे. वेळीच निर्णय घेतला असता तर व्यापाºयांचे नुकसानही टळले असते, असे या निसर्गप्रेमींनी सांगितले.