चिपळूण : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनी चिपळूणमधील नाट्यकर्मी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, यासाठी सांस्कृतिक केंद्रासमोर एकत्र आले होते. आता सांस्कृतिक केंद्र कधी सुरू होणार, याची वाट पाहायची नाही, निवेदने द्यायची नाहीत, तर यंदा दिवाळी पहाट हा कार्यक्रम सांस्कृतिक केंद्रासमोरील बंद दरवाजासमोर सादर करायचा. रसिक प्रेक्षकांच्याच उपस्थितीत बंद सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करायचे, असा महत्त्वपूर्ण निर्णय नाट्यकर्मींनी घेतला आहे.शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी भाऊ कार्ले, दिलीप आंब्रे, अभय दांडेकर, नाट्य संयोजक सुनील जोशी, सतीश कदम, संतोष केतकर, योगेश बांडागळे, कैसर देसाई हे सांस्कृतिक केंद्रासमोर एकत्र आले होते. सर्वांनी सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, यासाठी काय करता येईल, यावर चर्चा केली. प्रास्ताविक सतीश कदम यांनी केले. गेली चौदा वर्षे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद आहे.सांस्कृतिक केंद्राचे दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे दिवसा सांस्कृतिक केंद्राच्या तांत्रिक अडचणी आणि ऑडिटची कामे करा आणि रात्री सांस्कृतिक केंद्रात नाटके होऊ देत, अशी भावना भाऊ कार्ले यांनी व्यक्त केली. यावर्षीची दिवाळी पहाट सांस्कृतिक केंद्रात करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता 'दिवाळी पहाट' कार्यक्रम सांस्कृतिक केंद्रासमोरील पायऱ्यांवर केला जाणार आहे. यावेळी रसिकांना दर्जेदार गाणी ऐकायला मिळणार आहेत. सांस्कृतिक केंद्रातील दिवे पेटावेत, यासाठी केंद्राच्या परिसरात शेकडो दिवे लावले जाणार आहेत. तसेच दर रविवारी सायंकाळी पाच वाजता सर्व नाट्यकर्मी बंद नाट्यगृहासमोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असल्याचे दिलीप आंब्रे यांनी सांगितले.
'दिवाळी पहाट'ने होणार बंद सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 3:34 PM
chiplun, natak, diwali, ratnagirinews महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनी चिपळूणमधील नाट्यकर्मी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, यासाठी सांस्कृतिक केंद्रासमोर एकत्र आले होते. आता सांस्कृतिक केंद्र कधी सुरू होणार, याची वाट पाहायची नाही, निवेदने द्यायची नाहीत, तर यंदा दिवाळी पहाट हा कार्यक्रम सांस्कृतिक केंद्रासमोरील बंद दरवाजासमोर सादर करायचा. रसिक प्रेक्षकांच्याच उपस्थितीत बंद सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करायचे, असा महत्त्वपूर्ण निर्णय नाट्यकर्मींनी घेतला आहे.
ठळक मुद्दे'दिवाळी पहाट'ने होणार बंद सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पणयंदाची चिपळुणातील दिवाळी सांस्कृतिक केंद्रातच !