शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

घनकचरा प्रकल्प विनाविलंब करा अन्यथा न्यायालयात जाणार, मनसेचा रत्नागिरी नगरपरिषदेला इशारा

By अरुण आडिवरेकर | Published: January 20, 2023 7:10 PM

रत्नागिरी : शहरातील प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दांडेआडोम येथे करण्यात येणार आहे. याठिकाणी विनाविलंब घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावावा, ...

रत्नागिरी : शहरातील प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दांडेआडोम येथे करण्यात येणार आहे. याठिकाणी विनाविलंब घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावावा, असे न्यायालयाचे आदेश असतानाही अद्याप हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. हा प्रकल्प मार्गी लावावा अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन २० राेजी मनसेतर्फे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे देण्यात आले आहे.रत्नागिरी शहरातील घनकचरा नगरपरिषदेतर्फे प्रतिदिन २० ते २२ टन इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा करून तो साळवी स्टाॅप येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवला जातो. जिथे कोणत्याही प्रकारचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी तसेच प्रदूषण होत आहे. या घनकचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण ही होण्याची दाट शक्यता आहे.

डम्पिंग ग्राउंडच्याच शेजारी जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे संकलन वाढत चालले असताना रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन या अतिमहत्त्वाच्या विषयावर उदासीन आहे. हा प्रकल्प दांडेआडोम या ठिकाणी विनाविलंब व्हावा, असे सर्वाेच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तरीही नगरपरिषद प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली ही टाळाटाळ करत आहे का, असा प्रश्न मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.हा प्रकल्प दांडेआडोम येथे विनाविलंब व्हावा, अशी आग्रही मागणी मनसेतर्फे रत्नागिरी नगरपरिषदेकडे केली आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी यासंदर्भात एका महिन्याच्या कालावधीत हा प्रकल्प आपण मार्गी लावू, असे आश्वासन दिले आहे. नगरपरिषदेने एक महिन्यात हा प्रकल्प मार्गी न लावल्यास नगरपरिषद न्यायालयाचा अवमान करत आहे, असे समजून मनसे न्यायालयात जाणार असल्याचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी सांगितले.यावेळी राजू पाचकुडे, अॅड. प्रफुल्ल सावंत, जयेश दुधरे, सोम पिलणकर, शैलेश मुकादम, रूपेश चव्हाण, नैनेश कामेरकर, यश पोमेंडकर हे मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMNSमनसे