रत्नागिरी : विविध प्रकारचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही किंवा अर्जासोबत सातबारा जोडण्याची गरज नाही. भूमी अभिलेख विभागाने प्रमुख २३ बँकांशी सामंजस्य करार केल्याने या बँकांना डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.शेतकऱ्यांना किंवा जमीनधारकांना कुठलेही कर्ज घेण्यासाठी सातबारा उतारा सादर करणे गरजेचे असते. मात्र, आता राज्यात सर्वत्र सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. राज्यातील २ कोटी ५० लाख ६० हजार सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात २० लाख ८७ हजार १२३ सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण झाले आहे. राज्यातील सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण झाल्याने हे संगणकीकृत अभिलेख सर्व बँका व वित्तीय संस्थांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाने घेतला आहे.जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने बँकिंग पोर्टल (ँ३३स्र२://ॅ2ु.ेंँुंँ४े्र.ॅङ्म५.्रल्ल) विकसित केले आहे. त्याद्वारे राज्यातील कोणत्याही गावचे सातबारा, खाते उतारे व ऑनलाइनला नोंदविलेले डिजिटल स्वाक्षरीतील उतारे, फेरफार बँक अथवा वित्तीय संस्थांना प्रत्येकी १५ रुपये नक्कल शुल्क भरून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी आजपर्यंत २३ बँकांनी सामंजस्य करार केले आहेत.या सुविधेचा लाभ आता कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सातबारा उताराधारकाला मिळणार आहे. यापुढे बँकांचे किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज काढताना प्रस्तावासोबत सातबारा उतारा जोडण्याची गरज नाही. हा संगणकीकृत सातबारा उतारा बँकेकडे आपोआप उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकांचा खूप मोठा त्रास कमी होणार आहे.करार केलेल्या २३ बँकामहाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, गोंदिया, धुळे नंदुरबार, लातूर, औरंगाबाद, नगर, बुलडाणा, परभणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ कोंकण ग्रामीण बँक, कोटक महिंद्रा बँक, एच. डी. एफ. सी. बँक, आय. सी. आय. सी. आय., स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, जनता सहकारी बँक सातारा, आय. डी. बी. आय. बँँक.
कर्ज हवंय ना ? आता बँकेतच मिळेल सातबारा उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 6:16 PM
bankingsector, ratnagirinews विविध प्रकारचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सातबारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही किंवा अर्जासोबत सातबारा जोडण्याची गरज नाही. भूमी अभिलेख विभागाने प्रमुख २३ बँकांशी सामंजस्य करार केल्याने या बँकांना डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
ठळक मुद्देकर्ज हवंय ना ? आता बँकेतच मिळेल सातबारा उताराजमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून २३ बँकांशी सामंजस्य करार