शोभना कांबळेरत्नागिरी : विश्वभूषण, क्रांतिसूर्य, परिवर्तनाचे महामेरू, घटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य अशा असंख्य उपाधींनी गाैरविले गेलेले भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. कापडगाव (ता. जि. रत्नागिरी) येथील राजाराम माणका कांबळे यांनी आणलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे जतन गावात भक्तिभावाने केले जात आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने येथे बुद्धविहार आणि बाबासाहेबांचे स्मारक उभारले असून त्यात हा चांदीचा अस्थिकलश ठेवला आहे.
स्मारकाचे काम सुरू सामाजिक न्याय विभागाने २ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर केला. यातून या बुद्धविहाराची आणि बाबासाहेबांच्या स्मारकाची भव्य वास्तू आकाराला आली आहे. यात तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली असून, त्यासमोर बाबासाहेबांच्या अस्थींचा चांदीचा कलश ठेवण्यात आला आहे.
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांचा अस्थिकलश कांबळे आपल्या गावी कापडगाव बाैद्धवाडी येथे घेऊन आले.