शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

रत्नागिरी विसर्जन मार्गावर गटाराचे सांडपाणी

By admin | Published: September 01, 2014 9:51 PM

रत्नागिरी पालिका : पावसाळापूर्व कामाची ऐशी की तैशी

उमेश पाटणकर - रत्नागिरी --पाच दिवसांच्या बाप्पांचे उद्या (मंगळवारी) विसर्जन होत आहे. यानिमित्त रत्नागिरीच्या मांडवी किनारी विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत रंगणार आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून गणेशाची विसर्जन मिरवणूक जाणार असून, ही मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.गणेश विसर्जन अवघ्या काही दिवसांवर आले असताना गणेशभक्त आणि गणेशाला रत्नागिरी पालिकेने पावसाळापूर्व कामाच्या केलेल्या या ओंगळवाण्या कामाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. रस्त्यावरील खड्डे हा विषय रत्नागिरीत ऐरणीवर आला असतानाच आता या रस्त्याशेजारी असलेली गटारेही सांडपाणी रस्त्यावर सोडून दुर्गंधी पसरवत आहेत. विशेष म्हणजे येथील नगर पालिकेचा गणपती याच रस्त्यावरून जात असताना पालिका ढिम्म का? असा सवाल होत आहे. विसर्जन मार्गावरील गटारांची दुरवस्था झाल्याने गणेशभक्तांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. खुद्द मांडवी किनारी असणारा हायमास्ट वगळला तर जेट्टीवरील प्रकाश व्यवस्था पूर्ण मोडकळीस आली आहे.रत्नागिरी शहरासह कुवारबाव, नाचणे मिरजोळे येथील अनेक गणेशभक्त ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी मांडवी चौपाटीला प्राधान्य देत असतात. यामुळे शहराची मुख्य बाजारपेठ मिरवणुकीमुळे गजबजून जाते. रामनाका - तेलीआळी नाका- रहाटाघरमार्गे भुतेनाका मांडवी हा पर्यायी ८० फुटी रस्ता असला तरी विघ्नहर्त्याची विसर्जन मिरवणूक गोखले नाका, काँग्रेस भुवनमार्गेच जात असते. मार्गावरील संजीवनी हॉस्पिटलसमोर महावितरणच्या विद्युत जनित्रालगत असणाऱ्या गटारावरील झडपा गायब आहेत. यासोबतच मुरलीधर मंदिर नाका आणि मांडवीनाका येथेही गटारांवरील झडपा बसवण्याची गरज आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेला एखादा गणेशभक्त अशा ठिकाणी गटारात कोसळून गंभीर जखमी होण्याची शक्यता आहे. भुतेनाका येथील लोखंडी जाळी वाहनांच्या वर्दळीने वाकली असल्याने येथेही गणेशभक्त जखमी होण्याची शक्यता आहे. कित्ते भंडारी हॉलसमोरील भूमिगत गटार तुंबल्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरुनच वाहात आहे.प्रत्यक्ष मांडवी धक्क्याची दुरवस्था झाली असून, संरक्षक कठडे आता घातपाती कठडे बनले आहेत. जेटीवरील रेलिंगचे लोखंडी पाईप गंजून गायब झाले असून, अद्याप त्याची दुरुस्ती केलेली नाही. गणेश विसर्जन सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात या जेटीवर गर्दी होत असते. रेलिंग नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्दैवी प्रसंग घडण्याची दाट शक्यता आहे. जेटीवर उभारलेली प्रकाश व्यवस्थेची संपूर्ण यंत्रणा वाऱ्याच्या वेगाने आणि खाऱ्या हवेने पूर्णत: निकामी झाली आहे. गणपती विसर्जनानंतर मांडवी येथून माघारी येणारी वाहने ८० फुटी मार्गाने परत जातात. मात्र, भुतेनाका ते रहाटाघर बसस्थानक दरम्यान असणाऱ्या वळणावर पावसाचे पाणी साठून राहिले आहे. बाजूलाच असलेल्या गटारातील पाणी येथे साठत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या उंचीचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेच्या मार्गाने आपली वाहने काढत असतात. विसर्जनाच्या रात्रीही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास वाहतूक कोंडी होऊन अपघातात वाढ होणार आहे.