शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

नाट्य स्पर्धेच्या तिकिटांमधून दीड लाखांचा सूर

By admin | Published: February 06, 2015 11:02 PM

राज्य संगीत नाट्य स्पर्धा : रत्नागिरीकर नाट्यरसिकांनी दिला भरभरून प्रतिसाद

रत्नागिरी : महाराष्ट्र् राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी केंद्रावरती पार पडली. १६ ते ४ फेब्रुवारीअखेर सादर करण्यात आलेल्या संगीत नाटकांची १ लाख ४८ हजार ५८५ रुपयांची तिकिट विक्री झाली आहे.संगीत नाट्य स्पर्धेसाठी प्रेक्षकांचा प्रतीसाद उत्स्फूर्त होता. तिकिटे संपल्यामुळे हाऊसफुल्लचे बोर्डही लावण्यात आले होते. अनेक नाट्यरसिकांना तिकिटे न मिळाल्यामुळे हिरमोडही झाला. संगीत मत्स्यगंधा हा प्रयोग दि. १६ रोजी आश्रय सेवा संस्थेने सादर केला. त्यादिवशी ९ हजार ८२० रूपयांची तिकिट विक्री झाली. १७ रोजी सौभद्र नाट्य प्रयोगाची ९ हजार ८६० रुपयांची तिकिटे संपली. १९ रोजी संत सोहिरोबानाथ नाटकाची ५ हजार १७० रुपये तर २० रोजी संगीत एकच प्याला नाटकाची ९ हजार ४७० रुपयांची तिकिटे संपली.दि. २१ रोजी खल्वायनने सादर केलेल्या प्रिती संगमची १० हजार ९८५ रुपयांची तिकिटे संपली. संगीत धन्य ते गायनी कला नाटकाची ५ हजार ९९५ रुपयांची तर संगीत तुक्याची आवली ४ हजार ९६५ रुपयांची तिकिट विक्री झाली. संगीत पंढरपूर ४ हजार ८९५, संगीत शारदा ८ हजार ९८०, संगीत स्वयंवर ११ हजार ३२५ रुपयांची तिकिट विक्री झाली. गीता गाती ज्ञानेश्वर नाटकाची ३,९३५ रुपयांची तिकिटे संपली. चंद्र लपला मेघावरी नाटकाची ५ हजार ३५ रुपये तर संगीत मत्स्यगंधाची ११ हजार ७८० रुपयांची तिकिटविक्री झाली. संगीत संशयकल्लोळची १० हजार ७२० तर लावणी भुलली अभंगाला १० हजार ४०, संगीत ययाती देवयानी नाटकाची १० हजार ३४५ रुपयांची तिकिटे संपली. लावणी भुलली अभंगाला या नाट्यप्रयोगाची ७ हजार ८१५ तर संगीत स्वर्गहरण नाटकाची ७ हजार ४२० रुपयांची तिकिट विक्री झाली. सर्वात अधिक तिकिट विक्री संगीत मत्स्यगंधा नाटकाची झाली. या स्पर्धेमुळे महाराष्ट्र शासन सांस्कृ तिक कार्य संचालनालयास ७४ हजार ७९४ रुपयांचा महसूल मिळाला आहे.गतवर्षी संगीत नाट्य स्पर्धेत खल्वायनने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संगीत नाट्य स्पर्धेचे यजमानपद परत रत्नागिरीकरांना प्राप्त झाले होते. गतवर्षीपासून दर्जेदार संगीत नाटकांचा आस्वाद रत्नागिरीकरांना मिळू लागला आहे. (प्रतिनिधी)