रत्नागिरी : कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणा अडचणीत आली आहे. त्यामुळे शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र बंद ठेवण्यात आला आहे. त्याला लोकांनीही प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला आहे.
गृहिणींचे बजेट कोलमडले
रत्नागिरी : महागाईचा आगडोंब उडाल्याने गरीब, कष्टकऱ्यांचे हाल झाले आहेत. कोरोनाचा नोकरी, व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच कडधान्य, तेलाचे भाव वाढले आहेत. खाद्यतेलाच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
दुधासाठी लहान मुलांचे हाल
रत्नागिरी : जिल्हा अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या पिशवीबंद दुधावर अवलंबून आहे. त्यामुळे वेगवेगळ्या डेअरींच्या दुधाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेवरही परिणाम झाला आहे. दूध विक्रेत्यांनीही बंद ठेवल्याने लहान मुलांचे हाल हात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने भीती
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दररोज ५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तसेच एकाच दिवसात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोराेनाची दहशत वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहन चालकांकडून नाराजीचा सूर
रत्नागिरी : सागरी महामार्गावरील आरेवारेमार्गे गणपतीपुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार मागणी करूनसुध्दा रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शेतकरी प्रशिक्षित होणार
लांजा : मृदा पत्रिकेद्वारे मातीचे आरोग्य तपासून त्याप्रमाणे पीक परिस्थिती हाताळण्यासाठी कृषी विभागातर्फे थेट शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वत: शेतकरीच आपल्या जमिनीची सुपिकता ओळखून त्याप्रमाणे उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षित होणार आहेत.
फळ-भाजी विक्रेतेही घरात
रत्नागिरी : कोरोनाचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला आहे. कोरोनामुळे लॉकडॉऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहे. त्यामध्ये छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना घरातच रहावे लागले आहे.