शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
2
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
3
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
4
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
5
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
6
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
7
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
8
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
9
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी
10
IND vs NZ : फक्त २ षटकार अन् Yashasvi Jaiswal च्या नावे होईल वर्ल्ड रेकॉर्ड
11
राऊतांसाठी भुई चक्कर, ठाकरेंसाठी सुरसुरी तर शिंदे-फडणवीसांसाठी...; संजय शिरसाट कोणत्या नेत्यासाठी कोणता फटाका करणार खरेदी?
12
अजित पवारांनी सांगितलं तर उमेदवारी मागे घेणार का?; नवाब मलिक म्हणाले...
13
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
14
५ वेळा फेल... शेवटच्या प्रयत्नात मिळालं यश; ब्यूटी विद ब्रेन IAS ऑफिसरने 'अशी' केली कमाल
15
"मेरे पास माँ है!’’, अजित पवार यांच्याकडून आईसोबतचा फोटो ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा
16
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
17
Laxmi Pujan 2024: एका व्हायरल व्हिडिओनुसार लक्ष्मीपूजेत घंटानाद करू नये; त्यामागचे वास्तव जाणून घेऊ!
18
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
19
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
20
November Born Astro: नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक म्हणजे सुप्त ज्वालामुखी; वाचा गुण-दोष!

गेली तीन वर्षे लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज एकाच जागी, मिऱ्या समुद्र किनारी पडलंय अडकून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 4:24 PM

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

रत्नागिरी : येथील मिऱ्या समुद्र किनारी अडकून पडलेले बसरा स्टार जहाज बाहेर काढण्यासाठी दुबईतील एजन्सीने अनुत्सुकता दाखविली आहे. त्यामुळे हे जहाज अजूनही लाटांचा मारा सहन करत किनाऱ्यावर उभे आहे.हे इंधनवाहक जहाज दक्षिण आफ्रिकेहून ते शारजा दुबईला निघाले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे हे जहाज भरकटून मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर ३ जून २०१९ ला आले हाेते. तांत्रिक बिघाडामुळे ते जहाज भगवती बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवले होते; मात्र अजस्त्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्र किनारी लागले. या जहाजामध्ये १३ क्रूजर होते. मेरिटाईम बोर्ड, पोलीस, तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मध्यस्थीने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेरिटाईम बोर्डाचा युनायटेड दूतावासाशी अरब आमिरातीच्या पत्रव्यवहार सुरू आहे.महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींच्या साहाय्याने जहाजावरील जळके ऑईल काढण्यात आले. त्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे जहाज काढणार असल्याचे निश्चित झाले आहे; मात्र त्यातही तांत्रिक अडचणी आल्याने काेट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. खर्चामुळे एजन्सीने जहाज काढण्याबाबत अनुत्सुकता दाखवली.अनेक अडचणी आल्याने गेल्या तीन वर्षांपासून हे जहाज अद्यापही मिऱ्या समुद्र किनाऱ्यावरच पावसासह लाटांचा मारा झेलत उभे आहे. त्याबाबत अजूनही कोणताही तोडगा काढण्यात आले नाही.

केंद्राकडून तांत्रिक मंजुरी नाहीहे जहाज भंगारात काढण्यासाठी गाेव्याच्या एजन्सीशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर स्थानिक पातळीवरील काही लाेकांना एकत्र येत याचा ठेका घेण्याचे ठरविले. स्थानिक एजन्सीकडून हे जहाज काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार हाेते. मात्र, केंद्राकडून तांत्रिक मंजुरी न मिळाल्याने ते कामही रखडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी