रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भावमुळे आयोजित केलेले वर्षावास कार्यक्रम आपआपल्या शाखेत करावेत, असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीच्या रत्नागिरी तालुका शाखेने केले आहे.
बौद्धजन पंचायत समिती तालुका रत्नागिरी व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने. गेले अनेक वर्षे आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा वर्षावास धार्मिक प्रबोधनाचा कार्यक्रम सर्व गावशाखांमधून आयोजित केला जातो.
परंतु गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाहीत, तसेच तालुका व गावशाखा यांच्या संयुक्त सभाही झाल्या नाहीत.
सर्व गावशाखांनी आपल्या गावशाखेमध्ये वर्षावास कार्यक्रम करावयाचा असल्यास, आपल्या शाखेतील परिस्थिती पाहून, तसेच कोरोना साथीच्या आजारांपासून आपल्या शाखेतील सभासदांना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करावे, असे आवाहन तालुका शाखा अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस नरेंद्र आयरे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समिती अध्यक्ष संजय आयरे, चिटणीस, रविकांत पवार यांनी केले आहे.