शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लहरी हवामानामुळे ‘कोकणचा राजा’ बेभरवशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 2:29 AM

हापूसचे उत्पादन ३० टक्केच होण्याची शक्यता, चक्रीवादळानंतर ऋतूचक्र बदलल्याचा परिणाम

मनोज मुळ्ये/महेश सरनाईकरत्नागिरी / सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर कोकणातील हवामानात मोठे फेरबदल होत आहेत. उशिरापर्यंत पडलेला पाऊस, लांबलेली थंडी यामुळे मोहोर खूपच कमी आल्याने हापूस आंब्याचे उत्पादन यंदा केवळ २५ ते ३० टक्केच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे हापूस पिकला तरी कोकणचा राजा काही झिम्मा खेळू शकणार नाही आणि सर्वसामान्य ग्राहकांनाही बाजारात परडवणाऱ्या दरात आंबा मिळण्याची शक्यता धूसर आहे.कोकणच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा आंबा पिकावर अवलंबून  आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ५०० कोटींची उलाढाल होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही साधारण तेवढीच उलाढाल होते. मात्र, ऋतूचक्रात सतत होणाऱ्या बदलांमुळे आंबा पीक आता खूपच बेभरवशी झाले आहे.

दरवर्षी फेब्रुवारीत १० टक्के, मार्चमध्ये सुमारे २० टक्के आंबा मुंबईला जातो. एप्रिल आणि मेमध्ये उर्वरित आंबा बाजारात जातो.

nमेच्या अखेरच्या आठवड्यापासून कोकणातील आंबा कॅनिंगसाठी जातो आणि त्याचवेळी अन्य राज्यातील आंबा मुंबईत येतो. 

nयंदा फेब्रुवारीत गतवर्षीपेक्षा अधिक आंबा मुंबईत गेला. त्यात दरवर्षीप्रमाणे देवगड हापूसचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता आंब्यासाठी बाजाराला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा फेब्रुवारीत जादा आंबा मुंबई बाजारात गेल्याचा विरोधाभास दिसत असला तरी मार्च, एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचे प्रमाण खूप कमी असेल.

५०००० टन देवगड हापूसचे उत्पादन

देवगड येथील हापूस आंबा हा ४५,००० एकर क्षेत्रावर पिकविला जातो आणि पोषक वातावरण लाभल्यास उत्पादन ५० हजार टनांवर जाते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड नावाची आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भारतातील सर्वांत जुनी आणि सर्वांत मोठी सहकारी संस्था आहे. त्यात ७०० सदस्य असून, २०१३ साली या संस्थेस २५ वर्षे पूर्ण झाली.

निसर्ग वादळामुळे चक्र बिघडलेn गतवर्षी जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळ आले. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील हवामानात खूप मोठे बदल झाले. पाऊस उशिरापर्यंत पडत होता. त्यामुळे थंडी उशिराने सुरू झाली. n सप्टेंबरमध्ये पाऊस थांबल्यानंतर ऑक्टोबरमधील उन्हामुळे झाडांच्या मुळावर ताण येतो आणि त्यातून मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते.n मात्र, त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडीचे प्रमाण अपेक्षित असते. यंदा ऑक्टोबरमध्येही पाऊस पडत होता. त्यामुळे तेव्हा उन्हाळा जाणवला नाही. n थंडीही जानेवारीत सुरू झाली. त्यामुळे झाडांना मोहोर येण्याऐवजी सतत पालवीच येत होती.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा