राजापूर : तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून, सोमवारी रात्री दसूर व परुळे या गावात भक्ष्याचा पाठलाग करताना दोन बिबटे विहिरीत पडल्याच्या घटना घडल्या आहेत. वनविभागाने अथक परिश्रमाने त्या दोन्ही बिबट्यांना सुखरुप बाहेर काढले आहे.रविवारी सायंकाळी जांभवली गावातील साठ वर्षीय महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह गोठ्याजवळ आढळला. त्या महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच सोमवारी रात्री तालुक्यात दोन ठिकाणी बिबटे विहिरीत पडल्याच्या घटना घडल्या.
दसूर गावातील कमलाकर अर्जुन सुर्वे यांच्या घरानजीकच्या रात्री साडेबारा वाजण्याच्यादरम्यान एक बिबट्या विहिरीत पडला. वन खात्याच्या अधिकाºयांनी त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.दसूरमधील बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी परतत असतानाच तालुक्यातील परुळे गावात बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे हा सर्व ताफा परुळे गावात दाखल झाला. परुळे खापणेवाडीतील एका विहिरीत रात्रीच्याच वेळी बिबट्या पडला होता. वनअधिकाºयांनी या बिबट्यालाही सुखरुप बाहेर काढले व नंतर नैसर्गिक अधिवासात पाठवले.राजापूर तालुक्यातील परूळे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याने जीवदान दिले.