रत्नागिरी, दि. ४ : रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट आहे, समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस सतर्कता बाळगण्याच्या इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील हर्णे - बुरोंडी बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या असून अनेक बोटी जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत नांगर टाकून उभ्या आहेत.दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यांवर मध्यरात्री मोठी भरती आल्याने समुद्र किनाऱ्यांवरील अनेक दुकाने समुद्रात वाहून गेली. दक्षिणेकडे समुद्रात आलेल्या ओखी वादळाने कोकण किनारपट्टीवरही परिणाम जाणवू लागले आहेत.
कोकण किनारपट्टीवर रात्री उशिरा आलेल्या मोठ्या भरतीत ठिकठिकाणी नुकसान झाले असून मुरुड, हर्णे समुद्र किनाऱ्यांवरील दुकाने व छोट्या होडींचे मोठे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील समुद्राच्या पाण्याला जोरदार करंट मारत असून पुढील दोन दिवस वादळाचा धोका कायम असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, दापोली तालुक्यातील हर्णे - बुरोंडी या बंदरातील मच्छिमार बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या असून अनेक बोटीने जयगड - दाभोळ - आंजर्ले - बाणकोट खाडीत नांगर टाकला आहे.