शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
5
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
6
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
7
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
8
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
9
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
10
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
11
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
12
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
13
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
14
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
15
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
16
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
17
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
18
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
19
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
20
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?

VidhanSabha Election 2024: दापोलीत महायुतीत वाद, उद्धवसेनेचे चाचपडणे कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 12:37 IST

आमदार योगेश कदम यांना भाजपची साथ कितपत मिळेल याबाबत शंकाच

रत्नागिरी : सातत्याने मित्रपक्ष भाजपशी होत असलेल्या वादामुळे दापोलीविधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेला बराच संघर्ष करावा लागणार आहे. त्याचवेळी शिवसेनेतील फुटीचा त्रास महाविकास आघाडीतील उद्धवसेनेला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे दापोली मतदारसंघातील निवडणूक कोणालाही सोपी राहिलेली नाही.दापाेली आणि मंडणगड तालुक्यांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये आधीपासूनच वाद आहेत. शिंदेसेना स्वतंत्र झाल्यानंतरही हे वाद मिटलेले नाहीत. उलट लोकसभा निवडणुकीच्या आधी शीतयुद्ध स्वरुपात असलेले हे वाद अधिक उघडपणे आणि आक्रमकपणे पुढे आले आहेत. त्यामुळे महायुतीमधील तणाव वाढला आहे.

शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जवळ करताना भाजपशी सातत्याने पंगा घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांना भाजपची साथ कितपत मिळेल, याबाबत शंकाच आहे.अर्थात योगेश कदम यांनी पाच वर्षात बसवलेला जम पाहता उद्धवसेनेला येथे स्वत:चे पूर्वीचे स्थान निर्माण करणे फारसे सापे राहिलेले नाही.

युती नाते बिघडलेलेचगेल्या अनेक महिन्यात भाजप आणि शिंदेसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण दापोली मतदारसंघात परस्पर निधी खर्च करत असल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. त्यानंतर हा वाद वाढला आहे.

उद्धवसेनेचा संघर्ष कायमशिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून उद्धवसेनेत प्रवेश केला. मात्र गत निवडणुकीच्या तुलनेत राजकारणात बरीच उलथापालथ झाली असल्याने उद्धवसेनेचा संघर्ष कायम राहणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे