शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सोने-चांदी महागले, मॉडर्न आर्टिफिशियल ज्वेलरी भारी

By शोभना कांबळे | Published: May 22, 2024 6:03 PM

शोभना कांबळे रत्नागिरी : दिवसेंदिवस सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडू लागले आहेत. सोन्याला प्रति १० ग्रॅमसाठी जीएसटीसह ७७ ...

शोभना कांबळेरत्नागिरी : दिवसेंदिवस सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडू लागले आहेत. सोन्याला प्रति १० ग्रॅमसाठी जीएसटीसह ७७ हजार रुपये मोजावे लागत आहे, तर चांदीही आता जीएसटीसह ९५ हजार रुपये प्रति किलो झाली आहे. या दोन्ही धातूंच्या दरांवर आता नियंत्रणच न राहिल्याने या धातूंची खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होऊ लागली आहे. मात्र, या धातूंचे दर वाढू लागल्याने आता महिला माॅडर्न आर्टिफिशियल ज्वेलरीला तसेच बेंटेक्सच्या दागिन्यांना अधिक प्राधान्य देत आहेत.  अमेरिकेत सोन्यात गुंतवणूक वाढली आहे, तसेच चीननेही सोन्याची खरेदी वाढविली आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. पाठोपाठ चांदीच्या दरानेही उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्यात या दोन्ही धातूंच्या दरात घट होऊ लागली. त्यामुळे हे दर कमी येतील, असे वाटू लागले होते. सोने ७४ हजार ७०० रुपयांवर होते, त्याचा दर ७१ हजार ६०० रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, महिन्यानंतर ते पुन्हा  ७४ हजार ४०० रुपयांवर पोहोचले. ३ टक्के जीएसटीसह जवळपास ७७ हजार रुपयांपर्यंत पोहोचल आहे.  मे महिन्यात चांदीचाही दर वेगाने वाढू लागला आहे.या दोन्ही धातूंचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांना लग्नसमारंभात सोने मिरवणे अवघड झाले आहे. राेजगार करणारे मजूर, कामगार यांना तर आपल्या मुलीसाठी सोन्याचे दागिने करणे म्हणजे स्वप्नवत वाटत आहेत. त्यामुळे २०० ते ४००० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या बेन्टेक्सच्या दागिन्यांवर त्यांचा भर आहे. अगदी श्रीमंत घरातील मुली किंवा महिला माॅडर्न आर्टिफिशियल ज्वेलरीला अधिक प्राधान्य देत आहेत. वेगवेगळ्या डिझाईन्सची हौसही होते आणि ती खिशालाही परवडणारी ठरते. त्यामुळे त्याला प्राधान्य दिले जात आहे.सोन्याची पंच्याहत्तरी; चांदी लाखाकडेसोन्याचा दर पुन्हा ७५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमकडे जाऊ लागला आहे, तर चांदीही प्रति किलो लाखाच्या घरात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

..बेंटेक्सला मागणी वाढलीसर्वसामान्यांना सोने खरेदी करणे कठीण काम झाले आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, लघु व्यावसायिक व अन्य व्यवसायातील मजुरांच्या महिला व मुली सोन्यासारखेच चकाकणाऱ्या बेन्टेक्सचे दागिने वापरत आहेत. स्वस्त आणि मस्त म्हणूनही या दागिन्यांना पसंती मिळू लागली आहे.

 माॅडर्न ज्वेलरी भारी

  • लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये मिरविण्यासाठी सोन्याचा एकच दागिना वारंवार घालण्यापेक्षा त्याला पर्याय म्हणून आर्टिफिशियल ज्वेलरीला प्राधान्य दिले जात आहे.
  • कमी किमतीत; पण सोन्यापेक्षाही अधिक आकर्षक अशी माॅडर्न ज्वेलरी प्रत्येक वेळी बदलता येते. त्यामुळे महिला आणि मुलींमध्ये आर्टिफिशियल दागिन्यांची क्रेझ वाढली आहे.
  • अगदी नववधूही स्वागत समारंभात   मॅचिंग म्हणून हल्ली माॅडर्न ज्वेलरीला प्राधान्य देतात. महिला घराबाहेर पडू लागल्याने आकर्षक व्यक्तिमत्त्व राखण्यासाठी आर्टिफिशियल ज्वेलरीचा वापर करताना दिसतात.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGoldसोनं