शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

गुप्तधनासाठी खोदला खड्डा

By admin | Published: January 15, 2017 1:02 AM

महिलेसह ११जणांना अटक : दाभोळ येथील प्रकार; सर्वजण मुंबईचे

दाभोळ : जग २१व्या शतकाकडे झेपावत असताना समाजातील अंधश्रद्धा अजूनही मिटलेल्या दिसत नाहीत. दाभोळ येथे बंद घरात गुप्तधनासाठी खड्डा खोदणाऱ्या अकराजणांविरुद्ध दाभोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली. गुप्तधन खोदण्यासाठी दोन वाहने भरुन या मांत्रिकाने मुंबईहून सर्वजणास आणले होते. दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश तायडे हे सहकाऱ्यांसह मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दाभोळ वरचा विभाग येथे गणपती मंदिराच्या पुढील बाजूस नेहमी बंद असलेल्या घरात वीज दिसली. त्या घरात खोदकामाचा आवाज येत असल्याने तायडे यांनी गाडी थांबवून घराचा दरवाजा वाजविला. दरवाजा उघडल्यानंतर पोलिस आत गेले असता त्यांना माजघरात एक मोठा खड्डा खणलेला दिसला. खड्ड्याच्या एका बाजूला माती पडलेली दिसली, तर जवळच एकजण मंत्र उच्चारत होता.बाजूला हळद पिंजरीने रेषा आखलेल्या व खड्ड्यामध्ये नारळ, लिंबू असे साहित्य दिसून आले. या घरात आठ ते नऊ अज्ञात लोक व एक अनोळखी महिला दिसली. हे सारेजण पोलिसांना बघून लपण्याचा प्रयत्न करू लागल्याने घराच्या मालकाबाबत पोलिसांनी विचारणा केली. त्यांच्यापैकी दार उघडणाऱ्याने आपले नाव सांगून, हे घर सध्या आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना आणखीन संशय आला. त्यांनी या सर्वांची कसून चौकशी केली.आपली परिस्थिती खूपच नाजूक असून, ती सुधारण्यासाठी भगताने सांगितल्यानुसार आपण गुप्तधन काढण्याच्या हेतूने हा विधी करत असल्याचे मांत्रिकाने सांगितले. यापैकी दुसऱ्याने मंत्र म्हणणारा माणूस हा गुप्तधन काढून देण्याकरिता जादूटोणा करतो, असे सागितले. या मांत्रिकाने दि. १३ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मुंबई येथून दोन वाहने भरून माणसे खड्डा खोदण्यासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत पोलिस पाटील विनायक कुडाळकर यांना बोलावून घेतले. पोलिसांनी त्यांना सूचना करून घटनास्थळावर सापडलेले साहित्य हे त्याचठिकाणी ठेवून देण्यास सांगितले. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक तायडे यांनी स्वत: फिर्यादी होत पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणारा कायदा सन २०१३चे कलम ३(१) प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत कोठडीया सर्व ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता १७ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.बंगाली मांत्रिकाचा समावेशदाभोळ येथे गुप्तधनासाठी खड्डा खोदण्याचा प्रकार उघडकीस आला. या सर्व प्रकारामध्ये बंगाली मांत्रिकाचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. या सर्व आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.