शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

केळवत येथे पुलाचा कठडा तोडून डंपर नदीपात्रात कोसळला, चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 7:20 PM

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. गावानजीकच हा अपघात झाल्याने व डंपर नदीपात्रात कोसळल्याने मोठा आवाज झाला.

मंडणगड : डांबरमिश्रित खडी घेऊन जाणारा डंपर पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. हा डंपर विसापूर येथून देव्हारे येथे जात असताना केळवत (ता. मंडणगड) हा अपघात झाला. या अपघातात डंपर चालक जखमी झाला आहे.विसापूर येथील डांबर प्लांटवरून रस्त्याच्या कामाकरिता वापरात येणारी डांबरमिश्रित खडी भरून रेणुका कन्स्ट्रक्शन कंपनीचा दहाचाकी डंपर देव्हारे येथे जात होता. केळवत येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. गावानजीकच हा अपघात झाल्याने व डंपर नदीपात्रात कोसळल्याने मोठा आवाज झाला.या आवाजामुळे घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले. डंपर खाली अडकलेल्या चालकाला सोडवण्याकरिता तीन जेसीबी अपघातस्थळी बोलवण्यात आले हाेते. सुमारे एक तासांच्या प्रयत्नानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर चालकाला उपचाराकरिता पाठवण्यात आले.या मार्गावरून मंडणगडकडे येत असलेले विभागीय पोलीस निरीक्षक काशीद यांनी हा अपघात पाहिला. गांभीर्य लक्षात घेत ते स्वत: रेस्क्यू मोहिमेत सहभागी झाले हाेते. यावेळी प्रतीक पोतनीस, योगेश जंगम, राकेश गायकवाड, सुशील जागुष्ठे, नगरसेवक मुश्ताक दाभीळकर, इरफान बुरोंडकर, आल्पेश भोसले यांनी मदत कार्यात सहभाग घेतला. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामूणकर, पत्रकार प्रशांत सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यात सहभाग नोंदविला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात