शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

उपासमारीमुळे तडफडून बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:11 PM

संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपासमारीमुळे तडफडून बिबट्याचा मृत्यूसंगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील घटना

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे.रविवारी सकाळी सातच्या सुमारास घराशेजारी बिबट्या मृतावस्थेत पडला असल्याचे महेश किंजळकर यांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी वनपाल सुरेश उपरे यांना लगेचच ही माहिती दिली. वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.बिबट्या ज्या ठिकाणी मृतावस्थेत सापडला त्या ठिकाणी गवत मळले असल्याचे आढळून आले. यावरून उपासमारीमुळे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेल्या या बिबट्यााचा तडफडून मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तडफडल्यामुळे बिबट्याची कातडी जमिनीवर घासली जाऊन त्याला जखमाही झाल्या होत्या.विच्छेदनानंतर ग्रामस्थांसमक्ष बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपाल सुरेश उपरे वनरक्षक शर्वरी कदम आनंद धोत्रे राहुल गुंठे तसेच पोलीस पाटील रमेश तुलसनकर व मिलिंद शिंदे संतोष नागवेकर विजय कुवळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.नखे, मिशा सुस्थितीतहा बिबट्या मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे दोन वर्षे असल्याचे वनविभागाच्या पथकाने सांगितले. त्याची लांबी १५५ सेंमी असून उंची ४६ सेंमी आहे. त्याला १८ नखे असून, नखे व मिश्या सुस्थितीत असल्याची माहिती वनविभागाने दिली. त्यामुळे त्याला कोणी ठार मारले असल्याची शंका पुसली गेली आहे. विच्छेदनानंतर या बिबट्याचा मृत्यू हा उपसमारीमुळे झाला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग