शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

आभाळाएवढ्या जिद्दीला बेरोजगारीचे ग्रहण

By admin | Published: March 29, 2016 10:39 PM

सुकिवलीतील तरूणाची व्यथा : अपंगत्त्वावर मात करणाऱ्या उमेशकडे आजही सरकारचे दुर्लक्ष

श्रीकांत चाळके -- रत्नागिरी जन्मत:च अपंगत्व असूनही आपल्या जिद्दीच्या जोरावर तो घरच्यांचा आधार बनला. घरच्या प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता पारंपरिक भातशेतीत त्याचे हात राबू लागले आहेत. अपंगांच्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीनवेळा सुवर्णपदक पटकावून त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. त्याच्या धाडसाचे कौतुक होत असले तरी ४० टक्के अपंग असूनही त्याच्या या आभाळाएवढ्या जिद्दीला शासनाचे बळ मिळू शकले नाही, ही शोकांतिका आहे. उमेश ज्ञानेश्वर चाळके (३५) असे या युवकाचे नाव असून, आजही तो बेरोजगारीच्या खस्ता खात आहे.उमेश ज्ञानेश्वर चाळके हा सुकिवली येथे राहतो. जन्मत:च अपंगत्व आहे. त्याच्या पाठीला बाक आहे. ४० टक्के अपंगत्व असल्याने त्याला जोरात पळता येत नाहीत की अवजड कामेही करता येत नाहीत. हलकी आणि सहज होणारी कामे अगदी शक्य तिथपर्यंत तो वाकून करतो. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची़ पालकही काबाडकष्ट करताहेत़ त्यांनाही आजारांनी सदोदीत घेरलेलं़ संकटामागून संकटे़ तुटपंजी भातशेती़ भातशेती करण्यासाठी आवश्यक असणारे बैल, गोठा आणि चारा यांची नेहमीच वानवा़ परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याच्याजवळ नोकरीशिवाय पर्याय नाही. म्हणूनच जिद्दीने तो विविध वाहनांवर ड्रायव्हिंग शिकला. जोडलेला मित्र परीवार आणि आपुलकीच्या जोरावर जमेल त्या आणि मिळेल त्यावेळी त्याने वाहनांवर बसून ड्रायव्हिंगचे कसब आत्मसात केले.खेळामध्ये मिळवलेले यश आणि ड्रायव्हिंग परवान्यामुळे स्थानिकांसह लोटे येथील औद्यौगिक वसाहतीमधील काही कंपन्यांमध्ये त्याने ड्रायव्हिंग कामासाठी नोकरीही शोधली. मात्र, प्रत्येक वेळी त्याला आपल्या उंचीचा अडसर जाणवत होता. पाठीला बाक असल्याने त्यात त्याने आपली उंचीही गमावली. याचा परिणाम त्याला आपल्या प्रत्येक कामात भोगावा लागत आहे.़ आपल्या जिद्दीला लागलेलं हे बेरोजगारीचे ग्रहण कधी सुटणार, या चिंतेने त्याला ग्रासून टाकलं आहे.दहावीनंतरच्या शिक्षणासाठी त्याला आई-वडिलांच्या खांद्यावर जोखड ठेवायचे नव्हते. अनेक आर्थिक अडचणी उद्भवल्या. अखेर आर्थिक स्थैर्य देणारी एखादी नोकरी मिळवणे हे एकच उद्दिष्ट उमेशच्या डोळ्यांसमोर आहे. पैशांची जुळवाजुळव करून ड्रायव्हिंग परवाना मिळवण्यासाठी त्याने खटाटोप केला. अनेक सरकारी तसेच खासगी नोकऱ्यांसाठी आवश्यक अशा कागदपत्रांसमवेत अर्जही केले. पण, अपंगत्वाचं कारण त्याची पाठ सोडायला तयार नाही. मात्र, एका बाजुला वाढते वय आणि पदरी पडणारे नैराश्य यामुळे तो वैतागून गेला आहे.रोजीरोटीचा प्रश्न कायमसन २०१० आणि २०१२ मध्ये नागपूर आणि बेंगलोर येथे पार पडलेल्या अपंगांच्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दोन सुवर्णपदकेदेखील मिळवली. लांबउडीमध्येही त्याने सुवर्णपदक मिळवून आपल्या जिद्दीवर शिक्कामोर्तब केले.या यशाचे कौतुक झाले, मात्र रोजीरोटीचा प्रश्न कायम आहे.ट्रॅक्टरही चोरीलात्याची जिद्द पाहून त्याच्या काही नातेवाईकांनी त्याला कर्ज काढून ट्रॅक्टर घेऊन दिला. मात्र, वर्षभराच्या आतच घरासमोरील ट्रॅक्टर चोरीला गेला. पोलीस स्थानकात तक्रार देऊनही तो परत मिळाला नाही. त्याही परिस्थितीत दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्याने अशिक्षितपणावरही मात केली आहे. नोकरीची आसगेली १० वर्षे तो नोकरीसाठी झगडतोय. सध्या आई - वडिलांच्या मोलमजुरीवरील तुटपंज्या उत्पन्नावर त्यांची एका दिवसाची चूल पेटत आहे. तरीही वाट्याला आलेल्या अपंगत्वावर चिकाटीने मात केल्यानंतर या जिद्दीला नोकरीच्या रूपाने यश मिळेल, असं महेशला मनोमन वाटत आहे.