शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

तरुणाई सरसावली पर्यावरण संवर्धनासाठी...

By admin | Published: August 25, 2014 10:00 PM

सुसंस्कृत पर्यटन : जपले सामाजिक भान

चिपळूण : आजकालची तरुणाई सिनेमा, अचकट-विचकट गाणी व इस्टंट जमान्यात जगत आहे. तकलादू, बेगडी मुलाम्यावर त्यांचा अधिक भर असतो. मोबाईलवरील सोशल मीडियात ते दंग असतात. त्यामुळे तरुणाई वाया गेली, असे समजले जाते. परंतु, सामाजिक भान असणारी तरुण मंडळीही पोटतिडकीने आपले कर्तव्य पार पाडताना दिसते. सह्याद्री विकास समितीच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुण - तरुणांनी सुसंस्कृत पर्यटन अभियानात सहभाग घेऊन ते दाखवून दिले. सह्याद्री विकास समिती व लायनेस क्लब, चिपळूण यांनी पर्यावरण जागरुकता अभियान व सुसंस्कृत पर्यटनाची हाक दिली आणि चिपळूण परिसरातील ५० ते ६० महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी या हाकेला प्रतिसाद दिली. कोकणात पर्यटन वाढले पाहिजे. तसेच पर्यावरण रक्षण होताना जागतिक वारसा लाभलेला सह्याद्री वाचला पाहिजे, यासाठी सह्याद्री विकास समिती सातत्याने विविध उपक्रम राबवून जनजागृती करीत आहे. समितीचे कार्यकर्ते आपले कार्य तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी महाविद्यालयात निसर्ग अ‍ॅडव्हेंचर मंडळ स्थापन करुन काम करत आहेत. रविवारी सकाळी रघुवीर घाट येथे हे अभियान घेण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी दापोलीचे परिक्षेत्र वनअधिकारी राजेंद्र पत्की, खेडचे वनपाल सुरेश सुतार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव, वनरक्षक यशवंत सावर्डेकर, ए. एन. मंत्रे, आर. डी. खोत व त्यांचे सहकारी उपस्थित होते. सह्याद्री विकास समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र बावदणे, सचिव योगेश भागवत, राजाराम चाळके, चित्रकार प्रकाश राजेशिर्के, चिपळूण लायनेस क्लबच्या अध्यक्षा रेश्मा रेळेकर, सेक्रेटरी कपडेकर, माजी नगरसेवक सीमा चाळके, विजया भोसले, रंजना कदम, भरत सकपाळ, आनंद पवार, प्राची जोशी उपस्थित होते. सह्याद्री विकास समितीचे सचिव भागवत यांनी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली व अभियानाचा उद्देश सांगितला. सध्या निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे युवा पिढीने वनसंवर्धनाची मोहीम हाती घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. प्राची जोशी यांनी लायनेसच्या उपक्रमाची माहिती दिली व या कार्यक्रमाबाबत विवेचन केले. समारोपप्रसंगी प्रकाश राजेशिर्के, एसपीएमच्या दाभोळकर व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समितीचे सचिव भागवत यांनी पुढील कार्यक्रम व दिवसभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेऊन उपस्थितांचे आभार मानले. हा अनुभव घेतांना तरूणांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. (प्रतिनिधी)