शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

शिक्षण विभाग बॅकफूटवर

By admin | Published: November 21, 2014 11:14 PM

निर्णय चुकीचा : आॅफ लाईन पद्धतीने वेतनबिले स्वीकारण्याची मागणी

सागर पाटील - टेंभ्ये -संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर गेला महिनाभर शिक्षण विभागाचा सावळागोंधळ सुरु आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये ज्यांचा काहीही संबंध नाही, अशा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार बिल न स्वीकारण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय पूर्णत: चुकीचा असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विविध संघटनांच्या मागण्या व शासनाचा आदेश या संघर्षामध्ये सर्वसामान्य अध्यापक व कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे अयोग्य आहे. हा सावळा गोंधळ असाच सुरु राहिला तर नोव्हेंबरचा पगार कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळणे अशक्य आहे. यावर उपाय म्हणून आॅफ लाईन पद्धतीने वेतन बिले स्वीकारण्याची मागणी होत आहे.सन २०१३-१४च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे १०० टक्के समावेशन पूर्ण झाले आहे. एकही शिक्षक सेवेतून बाहेर जात नाही, असे असतानादेखील काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांना कार्यमुक्त न केल्याने व काही ठिकाणी हजर न करुन घेतल्याने ही प्रक्रिया प्रलंबित आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अपुरी आहे, त्या शाळांमधील शिक्षकदेखील अतिरिक्त करण्यात येऊ नयेत, ही मागणी अव्यवहार्य असल्याचे मत शिक्षण विभागाकडून व्यक्त केले जात आहे. या प्रक्रियेला विरोध करणाऱ्या शाळांची वेतन देयके स्वीकारु नयेत, असा आदेश शासनस्तरावरुन काढण्यात आला आहे. यामुळे प्रत्यक्षात शिक्षक व कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांचे पगार लांबणीवर जाणे हे पूर्णत: चुकीचे असल्याचे मत शिक्षकवर्गातून व्यक्त केले जात आहे. शासन स्तरावरुन याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने हा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात एकही शिक्षक सेवाबाह्य राहात नाही. यामुळे शिक्षकांचा प्रश्न विनाव्यत्यय सुटण्यास हरकत नसल्याचे मत शिक्षकवर्गातून व्यक्त होत आहे. सर्व बाबींचा साकल्याने विचार करून शासनाने सध्या आॅफ लाईन पध्दतीने वेतन देयके पत्रके स्वीकारून वेतन देण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसे न झाल्यास शिक्षकांवर अन्याय होईल.कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अन्यायकारकचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा नवा आकृतीबंध हा निश्चितच अन्यायकारक आहे. एका शाळेमध्ये किमान दोन शिपाई असणे आवश्यक आहे. लिपिकांच्या बाबतीमधील विद्यार्थीसंख्येचा निकष अव्यवहार्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांवर अन्याय होत आहे. याबाबत शासन स्तरावरुन तत्काळ निर्णय होणे आवश्यक आहे.आॅफलाईन वेतन देयके स्वीकाराजिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणे आवश्यक आहे. संचमान्यतेच्या प्रश्नामुळे वेतन लांबणीवर जाणे अयोग्य आहे. त्यामुळे सर्व शाळांची वेतन बिले आॅफलाईन पद्धतीने तत्काळ स्वीकारण्यात यावीत, अशी मागणी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी केली आहे.संचमान्यतेसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नावर लवकरच शासन निर्णय होणार आहे. शासनाचा आदेश होताच त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. शिक्षक कर्मचाऱ्याला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.- सर्जेराव जाधव, शिक्षण संचालक