लांजा : तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य
केंद्र, लांजा ग्रामीण रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. तालुक्यातील शासकीय रुग्णालयात
आतापर्यंत २,७५६ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
तालुक्यातील लांजा ग्रामीण रुग्णालयात सर्वप्रथम कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. तेथे २११० नागरिकांनी काेविड लस घेतली आहे. यामध्ये नगरपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आरोग्य
खात्याचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, इतर कर्मचारी तसेच ४५
ते ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व महिला यांचा समावेश आहे. त्यानंतर
प्राथमिक आरोग्य केंद्र, वाडीलिंबू येथे १९४, तर भांबेड प्राथमिक आरोग्य
केंद्र येथे १४८ जणांना लस देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील
ग्रामस्थांना लसीकरणाची सोय व्हावी, यासाठी प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरण करण्यात आले आहे.
सध्या साटवली प्राथमिक आरोग्य
केंद्र येथे ९९, जावडे प्राथमिक आरोग्य केंद्र ८२, रिंगणे प्राथमिक
आरोग्य केंद्र ५०, शिपोशी प्राथमिक आरोग्य केंद्र ७३ अशा सहा आराेग्य केंद्रात एकूण २७५६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.
तसेच लांजा येथील दीनदयाळ रुग्णालय येथे कोरोना लसीकरण केंद्र आहे. तालुक्यात आणखी एका खासगी रुग्णालयाने लसीकरण केंद्र सुरु करण्याचा
प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
काेट (फाेटाे आहे २९ तारखेला लांजा)
लस घेण्याबाबत नागरिकांच्या मनामध्ये शंका
आहेत. त्यांच्या शंका दूर करण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्यसेवक,
सेविका, आशासेविका मेहनत घेत आहेत. लवकरच लांजा तालुक्यात कोरोना लसीकरणाला वेग येऊन शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास आरोग्य
कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
- डॉ. मारुती कोरे, तालुका आरोग्य अधिकारी