देवरुख : संगमेश्वर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवे बुद्रुक गावात आठ दिवसांच्या लॉकडाऊनबरोबर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी ग्रामकृतीदलातर्फे आपल्या गावाची सुरक्षा लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्यातील निवे बुद्रुक गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन निवे बुद्रुक ग्रामकृतीदलाने २ ते ९ मे पर्यंत आठ दिवसांच्या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या आठ दिवसांच्या बंद कालावधीत वाडीतील एकही ग्रामस्थ विनाकारण वाडीच्या बाहेर येणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी तसेच आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये गावातून कामासाठी बाहेर जाण्यासाठी व गावात येण्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. हा लॉकडाऊन आपल्या गावाची सुरक्षा लक्षात घेऊन निवे बुद्रुक गावातील ग्रामपंचायत व ग्रामकृतीदलाने घेतली. गावात सध्या पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.