रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील रहिवाशी परंतु सध्या मुंबई येथे वास्तव्याला असणार सचिन गंगाधर विचारे यांची सुकन्या गृहिता (वय ८) हिने माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण ट्रेक पूर्ण केला. छोट्या महाराष्ट्राच्या हिरकणीच्या कौतुक करण्यात येत आहे.माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठताना आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जी आव्हाने तिच्या समोर होती ती म्हणजे, सरळ चढ असलेली शिखरं सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंझ, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आणि आव्हानात्मक हवामानातील बदलांना तोंड द्यावे लागले.
या अनुभवानंतर भल्याभल्यांनाही घाम फुटतो, पण गृहिता विचारे हिने काहीही झाले तरी ते उंच टोक गाठायचे अशी जिद्द उराशी बाळगली हाेती. या जिद्दीच्या जोरावर वडील सचिन विचारे यांच्या सोबत ती उंची गाठण्यात यश संपादन केले. १३ दिवसांचा हा ट्रेक, जो काठमांडूपासून (समुद्र सपाटीपासून १४०० मीटर उंच) रामेछाप विमानतळापर्यंत ४ तासांचा आहे.हरिता सुद्धा ट्रेकचा एक भाग होती पण टिंगबोचे (३८६० मीटर) च्या पुढे ती जाऊ शकली नाही. कारण तिला जास्त उंचीच्या आजाराचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढील औषधांसाठी तिला कमी उंचीवरुन परत यावे लागले. मात्र, आता ती पूर्णपणे ठिक आहे. सचिन विचारे आणि त्यांची सुकन्या गृहिता माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प वर पोहोचले. हाेते. त्यांनी आता परतीचा प्रवास सुरु केला आहे.